धान खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना होणार फायदा – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

आठवडा विशेष टीम― नाशिक, दि. 20 : आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.   पेठ तालुक्यातील करंजळी येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवळ बोलत … Read more

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण बुलडाणा, दि. 10 : कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन … Read more

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २५ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि. १० : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २५ हजार ३८० गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ हजार ११७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १९ कोटी ८८ लाख ०५ हजार ३५४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ … Read more

क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील कोरोना टेस्टिंग लॅबचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा, दि. १० : येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी  दिली होती. यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध … Read more

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत – पंतप्रधान

राज्यातील पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा आपत्ती निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी मुंबई दिनांक १०: आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या … Read more

लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १३ ऑगस्टपासून शिथिल होणार – पालकमंत्री अमित देशमुख

१७ ऑगस्टपासून लॉकडाऊन मागे घेणार मुंबई, दि.10:  कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर 17 ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली. जिल्ह्यातील लॉकडाऊन … Read more

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा [email protected] या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा. यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005 इंटर्नशीपसाठी नियम, अटी … Read more

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत

मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कोरोनाला घाबरु नका, पण सतर्क रहा, या विषयावर वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत  राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 10  ऑगस्ट आणि मंगळवार दि.11 ऑगस्ट व बुधवार दि.12 ऑगस्ट रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक … Read more

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या वरदान ठरतील – पालकमंत्री गुलाबराव पाटील

रानभाजी महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न जळगाव,दि. 9 – रानभाज्या या निसर्गाची देण आहे. अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असून त्या पौष्टिक व जीवनसत्वयुक्त असल्याने कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या वरदान ठरणार असल्याने प्रत्येक नागरिकाने आठवड्यात किमान दोन वेळा या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी … Read more

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – ॲड.यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांकडून जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा अमरावती, दि. 9:  मेळघाटसह आदिवासी क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रमांना चालना देण्यात आली असून,आदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी  महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच

शालेय शिक्षण विभागातर्फे दिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण मुंबई, दि.९: कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी,  संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑफलाईन आणि … Read more

कोविड-१९ महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री जयंत पाटील

मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत सांगली, दि. 9 : सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा … Read more

जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 9 :- जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दशरथ मारुती पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी झटणारा, विकासकामांचा सातत्यानं पाठपुरावा करणारा धडाडीचा सहकारी आम्ही गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जुन्नर तालुक्यातल्या अनेक संस्था, … Read more

क्रेडाईचे कोविड केअर सेंटर आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल : पालकमंत्री छगन भुजबळ

ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन नाशिक,दि.9 ऑगस्ट 2020 (जिमाका वृत्त) : कोविड रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 9 : जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे, कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन राज्यातील जनतेला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डोंगर-दऱ्या, रानावनात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी निसर्गसंपदेचं संरक्षण, संवर्धन तर केलंच, बरोबरीनं प्रथा-परंपरा, लोककला, लोकसंस्कृतीच्या माध्यमातून देशाचं सांस्कृतिक वैभव समृद्ध केलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांचा गौरव केला … Read more

जेव्हा कोविड केअर सेंटरमध्ये “माणसाने माणसाशी माणसासम…” प्रार्थना निनादते !

नांदेड दि. ८ : नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी इथे उपचार घेणारे बाधित उठतात. प्रातक्रिया आटोपून ही मंडळी एका वेगळ्या गोष्टीसाठी अतुरतेने वाट पाहत असतात. मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. संतोष टांकसाळे व त्यांची टीम कार्यरत असलेल्या या सेंटरचे समुपदेशक शौकतअली … Read more