marathi news epaper
औरंगाबाद: गलवाडा ता.सोयगाव गावात महावितरणच्या पथकाची वाॅशआउट मोहीम ,वीजचोरीच्या साहित्याची होळी
जरंडी,ता.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
येथून जवळच असलेल्या गलवाडा(ता.सोयगाव) गावात महावितरणच्या पथकाने रविवारी वाॅशआउट मोहीम राबवीत गावातील वीज पुरवठ्याचे सर्व अडचणी सोडवून गावाला खंडित वीज पुरवठ्यापासून मुक्त करण्यावर जोर देत गावातील तब्बल ७० वीज चोरांचे वीज चोरीचे आकोडे व साहित्य काढून घेत जनजागृती करून अख्ख्या गावाला वीज चोरी करण्यापासून परावृत्त करत या साहित्याची ग्रामपंचायत कार्यालयासमोर महावितरणच्या पथकाने होळी केली.
गलवाडा(ता.सोयगाव)गावात वीज पुरवठ्याचे मोठ्या अडचणीचा डोंगर निर्माण झाला होता.या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणचे सहायक अभियंता अभिजित गौर यांच्यासह पथकाने रविवारी गलवाडा गाव गाठून या गावातील रोहित्रे जळणे,वीज तार तुटणे,फेज कट होणे आदि अडचणींवर दुरुस्ती मोहीम हाती घेतली असता वीज चोरीचे प्रकार समोर आल्याने महावितरणच्या पथकाने हे वीज चोरीचे साहित्य जप्त करून ग्रामस्थांची जनजागृती करून या साहित्याची ग्रामपंचायतीसमोर होळी केली,गावातील वीज पुरवठ्याच्या अडचणी तूर्तास दूर करण्यासाठी सहायक अभियंता अभिजित गौर,पप्पू पाटील,विष्णू लाड,जनार्दन जोहरे,आदींच्या पथकाने वीज चोरीच्या साहित्याची होळी केली यावेळी सरपंच सुरेखा तायडे,भारत तायडे,ईश्वर इंगळे आदींनी याकामी पुढाकार घेतला होता.
औरंगाबाद जिल्ह्यात आज(दि.२१) दिवसात १७० जण कोरोना पॉझिटिव्ह , ४ जणांचा मृत्यू
औरंगाबाद, दि.२१:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1968 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1371 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 170 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3530 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. वाळूज पंढरपूर (1), क्रांती नगर (1), मिल कॉर्नर (1), बनेवाडी (1), एन नऊ, सिडको (2), शिवाजी नगर (4), न्यू विशाल नगर (2), न्यू हनुमान नगर (1), उस्मानपुरा (7), राजीव नगर (3), अबरार कॉलनी (1), सातारा परिसर (3), जयसिंगपुरा (6), सुरेवाडी (2), एन बारा हडको (1), बायजीपुरा (1), मयूर नगर, एन अकरा (1), अहिनेस नगर (1), जय भवानी नगर (3), मातोश्री नगर (1), न्यू बायजीपुरा (1), एन बारा, हडको (1), गजानन नगर (5), गरिष नगर (1), नारळीबाग (1), भावसिंगपुरा (1), कोकणवाडी (1), राम नगर (5), लक्ष्मी नगर (1), समर्थ नगर (1), राज नगर, छत्रपती नगर (1), सुभाषचंद्र बोस नगर (1), राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल (1), न्यू गजानन कॉलनी (2), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), गादिया विहार, शंभू नगर (1), एसटी कॉलनी, एन दोन (1), एन अकरा, नवनाथ नगर (3), एन अकरा दीप नगर (4), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (3), हनुमान चौक, चिकलठाणा (2), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), विष्णू नगर (1), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), उल्कानगरी (1), नागेश्वरवाडी (1), सुदर्शन नगर, हडको (1), एन पाच सिडको (1), कैसर कॉलनी (1), एन दोन, ठाकरे नगर (1), एन दोन सिडको (1), गारखेडा परिसर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (2), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (1), एमजीएम हॉस्पीटल जवळ (1), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (5), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (1), तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), छत्रपती नगर, वडगाव (3), राम मंदिराजवळ, बजाज नगर (1), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), आकाशवाणी परिसर (1), बुड्डीलेन (1), कटकट गेट (1), एन सहा, सिडको, मथुरा नगर (1), देवळाई (1), हर्सुल मध्यवर्ती कारागृह (2), हर्सुल जेल क्वार्टर (1), संभाजी कॉलनी, एन सहा (1), श्रीराम कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज (1), सादात नगर (1), भारत नगर, एन बारा, हडको (1), सिंधी कॉलनी (1), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (1), सिल्क मिल कॉलनी (1), सुरेवाडी, नागेश्वरी शाळेजवळ (1), नारेगाव (1), सुरेवाडी, जाधववाडी परिसर (1), जय भारत नगर, चिकलठाणा (1), पळशी (10), करमाड (1), पिसादेवी (2), कन्नड (6), गंगापूर (2), शिवूर (3) कविटखेडा, वैजापूर (1), भगतसिंग नगर (1), कासारी बाजार (1), एन सात, सिडको (2), विजय नगर, गारखेडा परिसर (1), टाऊन हॉल (1), उस्मानपुरा (1), गल्ली क्रमांक दोन अल्ताफ कॉलनी, गारखेडा (1), भारत नगर, समता कॉलनी (1) या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये 55 स्त्री व 115 पुरुष आहेत.
आतापर्यंत 1968 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1968 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत तीन, खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 21 जून रोजी सकाळी 7.45 वाजता मुकुंवाडीतील संजय नगर येथील 71 वर्षीय पुरूष रुग्णाचा, सकाळी 10.45 वाजता बायजीपुऱ्यातील इंदिरा नगरातील 66 वर्षीय पुरूष आणि दुपारी 12.10 वाजता एन आठ मधील यशोधरा कॉलनीतील 48 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीमध्ये 143 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात 140 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते.
तर शहरातील एका खासगी रुग्णालयात 21 जून रोजी सकाळी 8.30 वाजता न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरा नगर, गल्ली क्रमांक 21 येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 140, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 50, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 191 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज(दि.१९) १२२ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
औरंगाबाद, दि.१९:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1279 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 122 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3238 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. राजन नगर (1), बायजीपुरा (1), रहीम नगर (1), युनुस कॉलनी (1), हनुमान चौक चिकलठाणा (1), राम नगर (1), बजाज नगर (5), रशीदपुरा (1), नारळीबाग (2), क्रांती नगर (1), अंबिका नगर (1), पुंडलिक नगर (3), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), हर्सुल (2), एन नऊ सिडको (2), एन अकरा सिडको (2), मिल कॉर्नर (1),एन पाच सिडको (1), एन आठ सिडको (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (2), शंभू नगर (4), चिकलठाणा (5), रामकृष्ण नगर (2), इटखेडा (2), विश्वभारती कॉलनी (2), बीड बायपास (1), न्यू हनुमान नगर (2), जय हिंद नगर, पिसादेवी (1), भानुदास नगर (1), श्रीविहार कॉलनी, बीड बायपास (3), जाधववाडी (1), पळशी (1), आरीश कॉलनी (1), गौतम नगर, प्रगती कॉलनी (1), द्वारका नगर, हडको (1), समता नगर (2), शिवाजी नगर (2), लहू नगर (2), राम नगर (1), ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (4), मुजीब कॉलनी (5), रामेश्वर नगर (2), न्यू विशाल नगर (1), मयूर नगर (1), बुढीलेन (1), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), सिडको महानगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), साऊथ सिटी, सिडको महानगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), सारा गौरव, बजाज नगर (1), हर्सुल मध्यवर्ती कारागृह (5), एसबी नगर (1), उस्मानपुरा (3), अहिंसा नगर (1), अंगुरी बाग (1), जहाँगीर कॉलनी (1), लोटा कारंजा (1), खामगाव, फुलंब्री (1), झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड (1), पैठण गेट (1), जय भवानी चौक, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (2), प्रताप नगर (1), सिल्क मिल कॉलनी (1), जागृती हनुमान मंदिर, वडगाव कोल्हाटी (1), नाईक नगर, देवळाई (1), बानेवाडी, क्रांती चौक (1), एन एक सिडको (1), एन तीन, सिडको (1), हनुमान मंदिराजवळ गारखेडा परिसर (1), जय भवानी नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 80 पुरूष आणि 42 स्त्री आहेत.
आतापर्यंत 1781 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1781 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
*घाटीत सात, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू*
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 17 जून रोजी संध्याकाळी पाच वाजता औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालय परिसरातील 45 वर्षीय पुरूष रुग्णाचा, 18 जून रोजी दुपारी एक वाजता शिवशंकर कॉलनीतील 64 वर्षीय पुरूष, दुपारी 2.30 वाजता हडकोतील एन अकरा, मयूर नगर येथील 38 वर्षीय पुरूष, संध्याकाळी 6.45 वाजता आझाद चौक, रहीम नगर येथील 44 वर्षीय पुरूष, 19 जून रोजी मध्यरात्री 12.50 वाजता रोशन गेट येथील 65 वर्षीय स्त्री, पहाटे तीन वाजता रेहमानिया कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष आणि सकाळी 8.30 वाजता आकाशवाणी परिसरातील 67 वर्षीय पुरूष असलेल्या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात जुन्या मुकुंदवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील 58 वर्षीय कोरोनाबाधित स्त्री रुग्णाचा 19 जून रोजी सकाळी 10.15 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 131, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 46, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 178 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
बापरे..! औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी ‘१५५’ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर तिघांचा मृत्यू
औरंगाबाद दि.११:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 939 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 155 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2430 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जयसिंगपुरा, बेगमपुरा (1), मिसरवाडी (1), सुभेदारी विश्रामगृहा जवळ (1), उस्मानपुरा (2), एन आठ (1), जुना बाजार (1), आकाशवाणी परिसर (1), उल्कानगरी (1), संजय नगर (2), एन दोन सिडको (1), गणेश कॉलनी (1), बुड्डीलेन (2), बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (4), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), एमजीएम रुग्णालय परिसर (1), शिवाजी नगर (5), उत्तम नगर (4), कैलास नगर (7), गादिया विहार (1), सहकार नगर (1), नक्षत्रवाडी (1), चेलीपुरा (1), टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी (1), संजय नगर, बायजीपुरा (3), एन सात सिडको (1), न्यायनगर (2), हुसेन कॉलनी (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), साईनगर, एन सहा (2), एन आठ सिडको, गजराज नगर (1), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (2), हरिप्रसाद अपार्टमेंट (1), दशमेश नगर (1), पद्मपुरा (2), गांधी नगर (3),सिल्कमिल कॉलनी (1),विशाल नगर (3), बेगमपुरा (2), गोविंद नगर (1), समता नगर (2), फाजीलपुरा (4), न्यू हनुमान नगर (5), सिडको एन आठ (12), गौतम नगर, घाटी परिसर (2), रशीदपुरा (1), मयूर पार्क म्हसोबा नगर (1), भवानी नगर (2), भारतमाता नगर (3), विजय नगर (1), गारखेडा, गजानन नगर (1), कोहिनूर कॉलनी (1), जिल्हा परिषद परिसर (2), हर्सुल सावंगी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (3), टी व्ही सेंटर (1),बिस्मिला कॉलनी (3), सिडको वाळूज महानगर एक (2), एकता नगर, हर्सुल परिसर (1), बजाज नगर (8), साई नगर, पंढरपूर (3), जुनी मुकुंदवाडी (7), नारेगाव (1), गंगापूर (1), नायगाव (1), सिल्लोड (1), उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर (1), वेदांत नगर (1) एसआरपीएफ परिसर (2), इटखेडा (1), साईनगर, पंढरपूर (1), शहागंज (1), जटवाडा रोड (1), शरीफ कॉलनी, रोशन गेट (1), फतेह मैदान परिसर, फुलंब्री (1), एसटी कॉलनी (1), पैठण गेट (1), अन्य (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 90 पुरूष आणि 65 महिला रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1363 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत सहा, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या बाधास्वामी कॉलनीतील 45 वर्षीय पुरूष रुग्णाचा 10 जून रोजी रात्री 7.30 वा, कटकट गेट, नेहरू नगरातील 57 वर्षीय स्त्री रुग्णाचा रात्री नऊ वाजता, नूतन कॉलनीतील 40 वर्षीय पुरूष आणि त्रिमूर्ती नगरातील 67 वर्षीय पुरूष रुग्णांचा रात्री 11.30 वा, तर आज 11 जून रोजी पहाटे 2.45 वाजता नागसेन नगरातील 60 वर्षीय पुरूष, पहाटे 4.30 वाजता रोशन गेट येथील 60 वर्षीय स्त्री रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात आज पहाटे दोन वाजता रोशन गेट येथील 79 वर्षीय कोरोनाबाधित असलेल्या पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 98, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 29, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 128 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात असुविधा ,प्रशासन करतंय दुर्लक्ष ? डोळ्यावर काळीपट्टी बांधून धरणे आंदोलन
लिंबागणेश दि.१०:आठवडा विशेष टीम― जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील जिल्हारुग्णालयातील आरोग्य विषयक, शिक्षण, महसुल , प्राथमिक आरोग्य केंद्र, रिक्त पदे तसेच ग्रामिण भागातील पोलिस चौकी, पशूवैद्यकिय दवाखाना, पिण्याचे पाणी , शौचालय आदि. असुविधा वारंवार बीड जिल्ह्यातील दैनिकांनी प्रसिद्ध करून सुद्धा दुर्लक्ष करणा-या जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी व रिक्त पदे तात्काळ भरण्याची दृष्टी भालचंद्र गणपतीने हरकारला द्यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील रिक्त जागा, जिल्हा रुग्णालयात व केज ग्रामिण रूग्णालयात असणारी असुविधा त्यातुन रुग्णांचे हाल तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना अपुरी असुविधा या विषयी वारंवार विविध दैनिकातून प्रसिद्धी देऊन सुद्धा दृष्टीहीन सरकारला जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त लिंबागणेश येथिल जागृत देवस्थान भालचंद्र गणपती यांनीच दृष्टीदान करावी ज्यामुळे सरकार तात्काळ रिक्त पदे भरण्यात पुढाकार घेऊन बीड जिल्ह्यातील नागरीकांची गैरसोय दूर होईल यासाठी व वारंवार दैनिकांनी बीड जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी यांची पदभार देण्या बाबतची मनमानी व रुग्णांची असुविधा या विषयी वारंवार प्रसिद्धी माध्यमांनी निदर्शनास आणून देखिल दखल न घेणा-या जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज दि. १० जुन २०२० रोजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश येथे धरणे आंदोलन करण्यात आले , यासंबंधी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन डॉ गणेश ढवळे यांनी ई-मेलद्वारे पाठवले आहे.यावेळी विक्रांत ऊर्फ आप्पा वाणी, दिपक ढवळे , आगवान फौजी , आदि.लिंबागणेशकर हजर होते.
औरंगाबाद जिल्ह्यात आज दि.१० सकाळी ‘११४’ जण कोरोना पॉझिटिव्ह
औरंगाबाद, दि.१०:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2264 झाली आहे. यापैकी 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 865 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. कैलास नगर (2), कटकट गेट (1), संसार नगर (1), बारी कॉलनी (2),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (1), औरंगपुरा (1),सिडको एन सात (2),अरिहंत नगर (1), न्याय नगर, गारखेडा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), गजानन नगर, गारखेडा (1), भानुदास नगर (1), गारखेडा परिसर (5), सारंग सोसायटी (2), सहयोग नगर (2),सिटी चौक (1), खोकडपुरा (1), फाहेत नगर, राहत कॉर्नर (3), हर्ष नगर (2), बाबर कॉलनी (1), टिळक नगर (2), शहा बाजार (1), पडेगाव (3), शिवाजी नगर (1), बेगमपुरा (2), बजाज नगर,सिडको (1), जुना बाजार (1), मुलमची बाजार,सिटी चौक (2), मयूर नगर, एन अकरा (3), एन आठ (2), आकाशवाणी परिसर (1), मसोबा नगर (1), एन अकरा (1), एन चार,सिडको (1), विशाल नगर (1), आदिनाथ नगर, गारखेडा (2), जाधववाडी (1), टी. व्ही. सेंटर (1), आरटीओ ऑफिस परिसर (1),चित्रेश्वर नगर (1), बीड बायपास (1), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (2), रोकडिया हनुमान परिसर (1), मस्के पेट्रोलपंपाजवळ (1), प्रताप नगर,सिडको (1), एन सहा, साई नगर,सिडको (1), बंजारा कॉलनी (1), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (1), ज्योती नगर, दर्गा रोड (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (1), सावरखेडा, ता. सोयगाव (2), कन्नड (1), सिता नगर, बजाज नगर (5), बजाज नगर परिसर (11), सिडको वाळूज महानगर एक (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गणेश नगर, पंढरपूर (2), अन्य (16) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 39 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दि.९ मंगळवारी ८१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर ६ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 1283 कोरोनामुक्त, 751 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दि.९:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 751 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 81 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2150 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. वडगाव कोल्हाटी (1), बजाज नगर, मोरे चौक (3), पंढरपूर परिसर (1), बारी कॉलनी (2), रोशन गेट (3), कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ(1), नागसेन नगर,उस्मानपुरा (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), मिल कॉर्नर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (3), असेफिया कॉलनी (1), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), पेठे नगर, निसर्ग कॉलनी (1), नारेगाव (1), एन-11, मयूर नगर, हडको (1), बिस्मिला कॉलनी (1), रेहमानिया कॉलनी (2), एन-आठ सिडको (1), हर्सुल परिसर (2), सिल्लेखाना, क्रांती चौक (1), बंजारा कॉलनी (2), कटकट गेट, शरीफ कॉलनी (1), एसटी कॉलनी, कटकट गेट (2), संजय नगर, बायजीपुरा (1), गणेश कॉलनी, मोहनलाल नगर (4), वसंत नगर, जवाहर कॉलनी (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (2), समता नगर (3), पडेगाव (1), रोहिणी नगर (1), न्याय नगर (1), गादिया विहार (3), शिवाजी नगर (1), गारखेडा परिसर (3), अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर (2), व्हीआयपी रोड, काळीवाडा (1), सिटी चौक (2), युनुस कॉलनी (1), नूतन कॉलनी (2), रवींद्र नगर (1), दशमेश नगर (1), अरिहंत नगर (1), विद्या नगर (1), एन चार , गुरू साहनी नगर (1), अंबिका नगर (1), पोलिस कॉलनी, मुकुंदवाडी (1), एन सहा, सिडको (1) कैलास नगर (2), रोकडा हनुमान कॉलनी (1), जटवाडा रोड परिसर (1), इंदिरा नगर (1), रमा नगर, क्रांती चौक (1), कैसर पार्क (1), सिडको (1), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 28 महिला आणि 53 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1283 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत सहा, खासगीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील आरिफ कॉलनीतील 55 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा आठ जून रोजी दुपारी तीन वाजता, रात्री 9.15 वाजता क्रांती चौकातील रमा नगरातील 83 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज 09 जून रोजी पहाटे दीड वाजता जाधववाडीतील 40 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित, सकाळी 7.15 वाजता युनुस कॉलनीतील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आणि साडे सात वाजता जहागीरदार कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित, सकाळी 10.30 वाजता जिन्सी परिसरातील 80 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरातील एका खासगी रुग्णालयात रोशन गेट येथील मुजीब कॉलनीतील 67 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा सकाळी आठ वाजता, अन्य एका खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील 73 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा दुपारी साडे चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 88, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 27, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 116 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
औरंगाबाद: ‘घाटी’स पीपीई कीट, पाच व्हेंटीलेटर, मल्टीपॅरामॉनिटर ‘स्कोडा’कडून भेट
औरंगाबाद दि.०८:आठवडा विशेष टीम― कोविड- १९ या संसर्गजन्य आजाराने बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) संस्थेस १३८८ पीपीई किट, पाच व्हेटींलेटर, पाच मल्टीपॅरामॉनिटर स्कोडा कंपनी कडून देणगी स्वरूपात देण्यात आले.
यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, देणगी कक्षाचे समन्वयक अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड, ‘स्कोडा’चे उमा राव, डॉ.अभय कुलकर्णी, वेद जहागीरदार, प्रकाश तायडे, राजीव जोशी, नितिन कऱ्हाळे उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवार दि.८ रोजी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह ,३ जणांचा मृत्यू
औरंगाबाद दि.०८:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 708 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2069 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शिवशंकर कॉलनी (1), बौद्ध नगर (1), पीर बाजार, उस्मानपुरा (8), पोलिस क्वार्टर, तिसगाव (1), भोईवाडा, मिलकॉर्नर (2), सातारा परिसर (3), पद्मपुरा (1), फाजीलपुरा, मोहनलाल नगर (1), सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), मजनू हिल, दमडी मोहल्ला (1), ज्युबली पार्क (1), गारखेडा परिसर (1), चिकलठाणा (2), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर (5), सादाफ कॉलनी, कटकट गेट (2), पुंडलिक नगर (1), विद्या निकेतन कॉलनी (2), भोईवाडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), सेंट्रल नाका, बायजीपुरा (1),एन-चार, सिडको (1), कैलास नगर (1), पंढरपूर परिसर (4), अन्य (2), देवशी पिंपळगाव, गंगापूर (1), सावरखेडा, सोयगाव (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 19 महिला आणि 30 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1253 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत दोन, खासगीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील संजय नगरातील गल्ली क्रमांक 13 येथील रविवारी (दिनांक 07 जून रोजी) रात्री सात वाजता 43 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा आणि आठ जून रोजी दुपारी 12.10 वाजता इंदिरा नगरातील 70 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खासगी रुग्णालयात बायजीपुऱ्यातील 63 वर्षीय कोरोनाबाधित पुरूषाचा आज सकाळी 8.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एका खासगी रुग्णालयात शिवाजी नगर येथील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 82, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 25, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 108 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी आवाहन
औरंगाबाद दि.०८:आठवडा विशेष टीम― भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13 व वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात येत आहेत.
प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे संकेतस्थ्ळ http://dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत, असे आयुक्त, वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त डॉ.माधवी खोडे-चवरे यांनी कळविले आहे.
चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठीची सक्ती; अन्यथा कारवाई होणार
मुंबई दि.१:आठवडा विशेष टीम― राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यातील सीबीएसई आयसीएसई, तसेच केंब्रिज यांच्यासह आतंरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांनाही मराठी शिकविणे या वर्षापासून सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयाचे शाळा पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार त्या विभागातील उपसंचालकांना देण्यात आले आहेत.
पहिली व सहावीत मराठी सक्तीची अंमलबजावणी याच वर्षांपासून
राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी मंजूर केला होता. या कायद्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असे आश्वासन मराठी भाषा विभागमंत्री सुभाष देसाई व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात दिले होते.
धारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय उद्यापासून होणार कार्यान्वित ―राजेश टोपे
मुंबई दि.१:आठवडा विशेष टीम― मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहिल्यामुळे या भागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याचदा श्वास रोखण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते अशा वेळी या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात. स्थानिकांना आहे त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी मुंबई महापालिकेमार्फत धारावीतील बस डेपो जवळ हे कोरोना आरोग्य सेंटर सुरू करण्यात आले आहे. केवळ १५ दिवसांमध्ये २०० खाटांच्या या रुग्णालयाची उभारणी झाली असून तेथे प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे ज्या कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला त्याला तत्काळ या सेंटरमध्ये आणून ऑक्सिजन देऊन उपचार केले जातील.
या रुग्णालयासाठी १० डॉक्टर्स, १५ नर्स, वॉर्डबॉय तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णालात सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर थर्मल सेंसर यंत्रणा देखील असून त्याद्वारे तापाच्या रुग्णांची वेळीच तपासणी होणे शक्य होईल. कोरोनाशिवाय अन्य संशयित रुग्णांवर याठिकाणी मोफत उपचार करण्यात येतील.
आज आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. अल्पावधित रुग्णालय उभे राहिले याबद्दल त्यांनी यंत्रणेनेचे कौतुकही केले. यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. श्री. दिघावकर यांनी रुग्णालयाबाबत आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली.
लिंबागणेश ते वाघिरा काळेवाडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे २ महिन्यातच वाटोळे , ठेकेदारावर गुन्हे दाखल करा –डॉ गणेश ढवळे
बीड दि.०१:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश वाघिरा २५-१५ मधुन केलेल्या रस्त्याचे २ महिन्यातच तिनतेरा वाजले, ग्रामस्थांची मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांच्याकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड मार्फत लेखी तक्रार,कारवाईची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की ,लिंबागणेश ते वाघिरा मुळेवस्ति, वायभटवस्ति, काळेवाडी मार्गे २ महीन्यापुर्वी २५-१५ मधुन केलेला २३ लाख रुपये किंमतीचा रस्ता पावसाळ्यापूर्वी उखडला असुन त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.तसेच साईड पट्टी शेजारील काळ्या मातीनेच भरली असून ब-याच ठिकाणी साईडपट्टी भरलीच नाही.
मध्येच अर्धवट रस्ता सोडून दिला –अभिजित गायकवाड
निकृष्ट दर्जाचे काम करत असताना अभिजित गायकवाड यांनी चांगले काम करण्याची विनंती केली असता मधेच काम सोडून दिले ,माझे घर आणि शेत वगळता इतर ठिकाणी रस्ता केला आहे.
थातुरमातुर काम केलंय – अनिल मुळे , कल्याण मुळे
रस्त्याला ,पंखे शेजारील काळ्या मातीचे काही ठिकाणी तर काही ठिकाणी भरलेच नाहीत, ऊन्हाळ्यात सिमेंट रस्ता करताना पाणीच मारले नाही , कुणीही सरकारी अधिकारी काम बघायला आला नाही, २ महीन्यातच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश ता.जि.बीड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला होता
डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुले व महिलांनी मांजरसूंभा ते पाटोदा राज्यमार्ग भालचंद्र महाविद्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.तत्कालिन महिला व बाल कल्याण, तथा ग्रामविकास तथा पालकमंत्री बीड ना.पंकजाताई मुंडे यांनी , दूधधारक , भाजीपाला विक्रेते, आजारी रूग्णाला खांद्यावर उचलून दोन किलोमीटर चालत तसेच शाळकरी मुले चिखल तुडवीत शाळेत जात आहेत ही बातमी विविध दैनिकातून प्रसिद्ध झाल्यानंतर निधी मंजूर करून वितरीत केला.परंतु ग्रामपंचायतनेच बोगस रस्ता केला त्यामुळे कुंपनानेच शेत खाल्ले अशी ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि अपहारीत रक्कम शासन तिजोरीत जमा करण्यात यावी अशी लेखी तक्रार ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड , विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत दिली आहे.
अटलजी-मुंडे-महाजनांच्या विचारधारेत घडलेल्या परिपक्व मास लिडर – पंकजाताई गोपीनाथ मुंडे !
पैठण दि.३१:आदित्य✍ढाकणे―
खरंतर एक परिपक्व व्यक्ती कधीच कोणत्या गोष्टीसाठी भुकेलेला नसतो.समाजातील परिपक्व व्यक्ती कुणीही असू शकतो. घरातील कर्ता व्यक्ती जसा स्वत:च्या आशा आकांक्षा बाजूला सारून आपल्या कुटुंबासाठी जीवनपटलावर झगडत असतो, त्यांचा सुखासाठी , आनंदी जीवनासाठी संघर्ष करत असतो . तो कुटुंब प्रमुख परीस्थितीनुसार घरात असो वा नसो ,त्याचं व्हिजन क्लिअर असतं. तसंच काहीसं असतं काही परिपक्व राजकीय नेत्यांचं !
आजकाल नेता म्हटलं की फक्त सत्तेसाठी आसुसलेलं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण खरंच सगळेच नेते सत्तेसाठी आसुसलेले असतात का ? खरंतर सत्तेत नसताना सुद्धा जो राजकीय नेता आपल्या जनतेचे मायबाप होऊन त्यांचा भल्याबुर्या काळात त्यांना कायम एक आधारवड म्हणून जगतो तोच खरा सत्ताधीश असेल, हे माझं व्यैयक्तिक मत ! सत्ता वा कसलंही पद नसताना कोरोनासारख्या महामारीत सुद्धा जनतेच्या मदतीसाठी त्यांचा मायबाप होऊन जमेल तसं स्वत:ला झोकून देताना मी पाहिलंय रणरागिणी ला . होय , तीच रणरागिणी आपल्या लाडक्या ताईसाहेब , पंकजाताई गोपीनाथ मुंडे !
कोरोनामुळे राज्यातच काय तर संपूर्ण जगामध्ये अंधकारमय वातावरण पसरलंय . महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी याचं राजकारण करायला लागलेत ( काही मोठ्या पदावर असणार्या मोजक्या व्यक्ती).अशा स्थितीत ताईसाहेबांसारख्या नेतृत्वाने असल्या राजकीय खेळींपासून दुर राहत कोरोनाच्या अंधारात गुरफटलेल्या मायबाप जनतेला शक्य तेवढी मदत करण्यात स्वत:ला बिझी करण्यातंच धन्यता मानलीय.मग ते ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी ताईसाहेब जाणिवतेने लढताना आपण अनुभवलंय . तेही सत्ता नसताना, शक्य तसं कामगारांशी संपर्कात राहून अडचणी समजून घेणं ,राज्य सरकारला जाब विचारून तात्काळ निर्णय घ्यायला भाग पाडणारं हे नेतृत्व. एवढंच नाही तर आज घेतलेली मराठवाडा पाणी परिषद ताईसाहेबांची दुरदृष्टी दाखवते.
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या मार्फत ‘उत्थान’ अंतर्गत पंकजाताईंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संबंध महाराष्ट्रामध्ये मुंडेजीच्या संघर्ष योध्यांनी कोरोनाच्या काळात जनतेसाठी जे मदतकार्य राबवलं ते एका प्रतिष्ठानसाठी दैदिप्यमान आणि उल्लेखणीयंच ! सत्तेच्या खेळीपासून दुर राहून आदरणीय मोदींजीच्या आवाहनाला सज्ज राहत व मुख्यमंत्र्यांच्या योग्य निर्णयांचं स्वागत करत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत ताईसाहेब जनतेसाठी मदतकार्यात किंचीतही कमी पडत नाहीत , मदतकार्य सुरूच आहे. शेवटी लोकनेत्याच्या लेकीने कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करण्याचा वसा घेतलेला आहे .
चाणक्य म्हणतात ‘ कोई भी व्यक्ती अपने कार्यो से महान होता है, जन्म से नही ‘ हेच मला पंकजाताईंबद्दल नक्की म्हणावं वाटतंय कारण साहेबांची लेक म्हणून जरी जन्म घेतला असला तरी एक मंत्री या नात्याने ताईसाहेबांनी जणू एक विकासगंगाच मराठवाड्यात आणलीय ,रस्ते महामार्ग,जलयुक्त शिवार, हक्काचा पिकविमा, ग्रामविकास च्या माध्यमातून केलेली कामे कितीतरी आहेत , त्यानुसार मला २०१४ च्या आधीचा मराठवाडा आणि आत्ताचा मराठवाडा ,फरक स्पष्ट जाणवतोय .
पण दुर्दैवाने २०१९ च्या विधानसभेत काही अनपेक्षीत कारणांमुळे पराभव स्विकारावा लागला आणि तेव्हापासून पक्षातीलच मोजक्या लोकांनी ताईसाबांविरोधात नीच पातळीचं राजकारण सुरू केलंय. एक महिला नेतृत्व असल्याचा फायदा तर ही राजकीय मंडळी पुरेपूर घेतीय .
अशा नीच लोकांना एवढंच सांगेल की, आदरणीय प्रमोदजी आणि मुंडेसाहेबांच्या विचारांतून वाढलेलं हे ‘पंकजा’ नावाचं फूल भाजपच्या मोजक्या मंडळींनी बनलेल्या चिखलातून ऊमलणार सुर्य किरणांच्या साक्षीने. आणि राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत सुध्दा पोहोचेल ! तेव्हा मुंडेत्वात वाढलेल्या प्रत्येक संघर्ष योध्याच्या संघर्षाचं चीज झालेलं असेल !
पंकजाताई मुंडे यांनी केले पहिल्या ‘लाईव्ह’ पाणी परिषदेचे उदघाटन ; दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी शासनाने एकात्मिक योजना राबवावी
पाणी परिषदेच्या मागण्यांसाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही भेटू
औरंगाबाद दि. ३०:आठवडा विशेष टीम―
सततचा दुष्काळ आणि पाण्याचा तुटवडा यामुळे मराठवाडयाची तहान कधीच भागली नाही, ज्याचा फार मोठा परिणाम इथल्या उद्योगांवर झाला आणि हा भाग दुर्दैवाने नेहमीच मागास राहिला. ही दुर्दशा कायमची संपविण्यासाठी शासनाने मराठवाड्यात एकात्मिक जलनीती राबवावी अशी मागणी पंकजाताई मुंडे केली आहे. हक्काच्या पाण्यासाठी प्रवास आणि प्रयास या दोन्ही प्रक्रिया निरंतर चालूच ठेवल्या पाहिजेत असे सांगून मराठवाडा पाणी परिषदेने केलेल्या मागण्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत घेऊन जावू आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मराठवाडा पाणी परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या ‘लाईव्ह’ पाणी परिषदेचे उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. आपल्या उदघाटनाच्या भाषणात त्यांनी मराठवाड्यात सतत निर्माण होत असलेल्या दुष्काळी परिस्थिती कडे शासनाचे लक्ष वेधले. सुरवातीला पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी प्रास्ताविक केले.
भाषणाच्या सुरवातीला पंकजाताई मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाण्यासाठी लढणा-या योध्द्याचे स्वागत करून मराठवाड्याची कन्या म्हणून बोलाविल्याबद्दल आभार मानले. पाण्याचा प्रश्न हा या भागासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. मी राजकारणात सुरवाती पासूनच नीर आणि नारी या बाबींवर काम केले. मराठवाड्यातील पाण्याच्या प्रश्नांवर काम करण्यास मला लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी पहिल्यापासूनच सांगितले होते. आमदार असताना मतदारसंघात मी यावर काम केले पण नंतर सुदैवाने मंत्री म्हणून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मला काम करता आले, मराठवाडयाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी यावेळी मी प्रयत्न केला. तसे पाहिले तर दिवंगत नेते शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांनी या भागात खूप चांगले काम केले, या भागात पाणी आणण्यासाठी अतोनात कष्ट वेचले असे त्या म्हणाल्या.
एकात्मिक योजना असावी
मराठवाड्यात २०१२ पासून सतत दुष्काळ आहे, पण इथल्या विकासाची भूमिका मात्र कुणीच लक्षात घेतली नाही. इतर भागाच्या इथे पाण्याचा मोठा तुटवडा आहे. कोकणाचे क्षेत्र ४६ टक्के असून तिथे ७५ टक्के पाणीसाठा आहे, विदर्भाचे २८ टक्के क्षेत्र असून तिथेही १८ टक्के पाणी आहे त्यामानाने मराठवाड्याचे क्षेत्र २६ टक्के असूनही इथे केवळ ६ टक्के पाणी उपलब्ध आहे. पाण्याची गरज ६०७ टीएमसी आहे परंतु २९० टीएमसीच पाणी उपलब्ध आहे तिथेही ३१७ टीएमसी तुट आहे, म्हणजेच गरजे एवढे पाणी नाही, ही दशा संपली पाहिजे. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एकात्मिक जलनीतीचा अवलंब करणे आता आवश्यक झाले आहे. पाणी अडविणे ही लोकचळवळ बनली पाहिजे, शिवाय जायकवाडीतील गाळ काढणे, रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करणे, अपूर्ण धरणे बांधणे, भूजल कायदा, पीक पध्दती ,आंतर खोरे अंतर्गत पश्चिम वाहिनी नद्या, कृष्णा खोरे, पैनगंगा, वैनगंगा खो-यातील हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळाले पाहिजे यावरही पंकजाताई मुंडे यांनी परिषदेत भर दिला.
तर,मुख्यमंत्र्यांनाही भेटू
मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले तर इथले सिंचन क्षेत्र वाढेल तसेच उद्योगही भरभराटीस येतील परिणामी इथली आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्यामुळे या भागाला शक्ती देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून काम करण्याची गरज आहे. सध्या राज्य आणि देशापुढे कोरानाचे मोठे आर्थिक संकट आहे पण पाणीही आवश्यक आहे असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या. पाणी परिषदेने केलेल्या दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एकात्मिक जलनीती, जिल्हा व तालुका निहाय सिंचन विषयक आराखडा, बंधारे पूर्ण करण्याकरिता आवश्यक निधी, शेतक-यांना ठिबकचे अनुदान, शेतीमालाला वाढीव हमीभाव आदी मागण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचीही भेट घेऊ तसेच या भागातील जनतेला न्याय देण्यासाठी पाणी परिषदेच्या या लढयात सातत्याने सोबत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.