केज दि.१८ जुलै:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील लाडेगाव परिसरात एक मृतदेह आढळून आला. त्याचा खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.बाबासाहेब चंद्रभान लाड (वय ३९) असे मयताचे नाव आहे.अंबाजोगाई रोडवरील लाडेगाव परिसरातील अर्जुन लाड यांच्या शेतात शनिवारी (दि.१८) सकाळी मृतदेह आढळून आला. यावेळी मयताच्या अंगावर जखमा आढळून आल्या. अनैतिक संबधातून हा खून झाला असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असुन आठ ते दहा जणांनी मिळून त्याचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि.आनंद झोटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.
Marathi News Kaij
केज: चंदनसावरगांव पासून ३ कि.मी. परिसरातील कन्टेनमेंट झोन आणि त्यापुढील ४ कि.मी. परिसरातील बफर झोन शिथील
बीड, दि.३:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील चंदनसावरगांव येथे कोरोनाचा (कोविङ -१९) रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्यामुळे गावापासून ३ कि.मी. परिसरातील गावे कन्टेनमेंट झोन आणि त्यापुढील ०४ कि.मी. परिसरातील गांवे बफर झोन जाहीर करुन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही. तसेच शासनाचे नियमानुसार मधील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याचे कळविले असल्याने चंदनसावरगांव पासून ३ किलोमीटर परिसरात चंदनसावरगांव, भाटूंबा, केकतसारणी, कुंभेफळ, बनकरंजा हा परिसरातील कन्टेनमेंट झोन व ४ कि.मी. परिसरातील आनंदगांव सारणी, जवळबन, ढाकेफळ, जानेगांव, होळ, कळंबअंबा, मानेवाडी व उंदरी हि गावे ७ किलोमिटर परिसरात येत असुन त्या ठिकाणीचे बफर झोन शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
संचारबंदी काळात सिरसाळा येथील पोलीसांना झालेल्या मारहाणीतील आरोपींना जामिन मंजुर
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― संचारबंदी काळात सिरसाळा (ता.परळी) येथे बुधवार,दि.25 मार्च 2020 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पो.नाईक किशोर कचरू घटमाळ व पो. नाईक जेटेवाड हे कोरोना संचारबंदीचे काळात वडार गल्ली सिरसाळा येथे गेले असता तुकाराम बाबु पवार यांचे घरासमोर पुरूष व महिलांची गर्दी जमलेमुळे त्यांना घरात बसा व संचारबंदीचे नियम पाळा असे पो.ना.घटमळ यांनी राम तुकाराम पवार व इतरांना सांगत असताना अचानक 1) राम तुकाराम पवार,2) श्रीराम बाबु पवार, 3) अशोक तुकाराम पवार, 4) विकास अर्जुन मिटकर, 5) राजु राम लष्करे, 6) विशाल मिटकर, 7) सोनाली राम पवार, 8) सोजरबाई तुकाराम पवार, 9) पप्पु श्रीराम पवार यांनी व इतर 3 जणांनी पोलीस नाईक घटमल व जेटेवाड यांना लाकडाने,विटाने व दगडाने मारहाण केली.त्यात पोलीस ना.घटमल व जेटेवाड हे गंभीर जखमी झाले अशी फिर्याद पो.स्टे. सिरसाळा यांनी बुधवार,दि. 25/03/2020 ला दिल्यावरून त्याची नोंद फा.क्र.63/2020 प्रमाणे गुन्हा कलम 353,307, 332,336,143,147, 149,323,504,506, 188,आय.पी.सी.व कलम 51 (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे नोंद झाला.वरील आरोपींना 25/10/2020 रोजी सुमारे 10 वाजता अटक केली.परळी न्यायालयाने त्यांना दिनांक 26/03/2020 ते 06/04/2020 पर्यंत पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर 16/04/2020 पर्यंत व पुढे न्यायालय कोठडी दिली आहे.वरील सर्व आरोपींविरुध्द पोलीस सिरसाळा यांनी खोटा गुन्हा दाखल केला.सकृत व प्रथम दर्शनी आरोपींविरूद्ध दाखल केलेला आरोप चुकीचा आहे.वैद्यकीय अहवालही संशयास्पद आहे.उलट आरोपीस पोलीसांनी मारहाण केलेच आरोपीचे म्हणणे आहे. आरोपीनी गुन्हा केला नाही. इत्यादी प्रकारची ठोस बाजुचा मे.जिल्हा व सत्र न्यायालयासमोर युक्तीवाद करून पोलिसांनीे सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद आहेत.आरोपींना जामिनवर सोडण्याची मागणी अॅड.विष्णुपंत सोळंके यांनी केली.असता मे.सत्र न्यायालयाने वरील सर्व आरोपींना 15 हजार रूपयांचे जामीनवर मुक्त करण्याचे आदेश देवून सर्वांनी दर सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत पो.स्टे.सिरसाळा येथे हजेरी लावणेचा आदेश ही दिला आहे.
संचारबंदी व कोरोना परिस्थितीतील सदरील घटना ग्रामीण भागातील असलेमुळे त्यावेळी राज्यभर दुरदर्शनवर व वर्तमानपत्रात खुप गाजलेली आहे.सदर प्रकरणात आरोपींची बाजु अॅड.विष्णुपंत सोळंके , अॅड.रणजित सोळंके, अॅड.एस.ए.पांचाळ, अॅड.रामेश्वर जाधव, अॅड.शिवराज साळुंके यांनी पाहिली आहे.