पंकजा मुंडे समर्थ आहेत महाराष्ट्र भाजपाच नेतृत्व करायला…!

आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मध्ये सध्या ओबीसी विरोधी घटना घडत असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्यावर जनतेतून एकच आवाज उठत आहे पंकजा मुंडे ह्याच आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करू शकतील.भाजपा मध्ये गट बाजी कोणामुळे पडली हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे.खडसे ,तावडे आणि त्याचसोबत पंकजा मुंडेंना डावलून ह्यांना काय सिद्ध करायचे होते तेच कळत नाही.? भारतीय जनता पार्टीच्या एका नेता-कार्यकर्त्यांच्या फळीने पंकजाताई मुंडे यांचच नेतृत्व स्वीकारलं असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय स्तरावर सुरू आहे.पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार सारख्या योजना दुष्काळी भागात आणल्या त्याचा भरमसाठ फायदा देखील शेतकरी वर्गाला झाला ते ओळखून आता शेतकरी देखील पंकजा ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायला लागला आहे.

आघाडी सरकार कडून शेतकऱ्यांच्या लाभासाठी भारदस्त अशा योजना सुरू केल्या गेल्या नाही.केवळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकरी राजा सुखावत नसतो.ह्याचा मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला भविष्यात होणार आहे.भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र ते सध्याच्या नेतृत्वाला शक्य झाले नव्हते. मात्र आता हीच वेळ आहे पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपाला पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये ऊदयास आणण्याची.

भाजपा नेत्या मा.पंकजाताई मुंडे शनिवारी करणार पहिल्या ‘लाईव्ह’ पाणी परिषदेचे उदघाटन

दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेचा उपक्रम

औरंगाबाद दि.२६:आठवडा विशेष टीम―
मराठवाड्यात सातत्याने निर्माण होणा-या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने येत्या शनिवारी (ता.३०) पहिली ‘लाईव्ह पाणी परिषद’ आयोजित करण्यात आली आहे, परिषदेचे उदघाटन पंकजाताई मुंडे हया करणार असून मराठवाड्यातील पाणी प्रश्नांवर यावेळी त्या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

येत्या ३० तारखेला सकाळी ११ ते ४ या वेळेत ग्रामविकास भवन एन – २, सिडको औरंगाबाद येथून ही पाणी परिषद फेसबुकवरून ‘थेट लाईव्ह’ होणार आहे. त्यासाठी परिषदेने http://www.facebook.com/GramvikasSanstha1/ फेसबुक लिंक व Gramvikas Sanstha Aurangabad ही यू ट्यूब जाहीर केली आहे.

यासाठी ही परिषद

सततच्या दुष्काळामुळे मराठवाडयाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मराठवाड्याच्या हिश्शाच्या उपलब्ध जलसंपत्तीचा पूर्ण क्षमतेने एकात्मिक पध्दतीने विकास व प्रभावी व्यवस्थापन केल्यास दुष्काळ निवारण शक्य आहे यासाठी आयोजित केलेली ही परिषद ‘दुष्काळमुक्त मराठवाडयासाठी एकात्मिक जलनीती’ या प्रमुख संकल्पनेवर आधारित आहे. परिषदेत मराठवाडयाचा पाणी प्रश्न व उपाय, दुष्काळमुक्त मराठवाडयासाठी आंतरखोरे पाणी परिवहन, पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर या विषयावर डाॅ. रमेश पांडव, शंकरराव नागरे, डाॅ. भगवानराव कापसे हे जलतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचा समारोप आ. अंबादास दानवे करणार आहेत. वर उल्लेख केलेल्या फेसबुक लिंक आणि यू ट्यूब वरून सर्व जलप्रेमी नागरिकांनी पाणी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, उपाध्यक्ष मनोहर सरोदे, सचिव नवनाथ पवार यांनी केले आहे.


#CoronaVirus बीड जिल्हा : कोरोनाचे दोन अहवाल पॉझिटिव्ह

बीड दि.१६:आठवडा विशेष टीम― कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असताना बीड जिल्ह्याने इतके दिवस कोरोना विरोधात लढविलेली खिंड अखेर पडली. मुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एक अशा दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे. बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मागील महिन्यात सापडलेला रुग्ण नगर जिल्ह्याच्या जवळ असलेल्या आष्टी (जि.बीड) या तालुक्यातील होता. तसेच त्याच्यावर अहमदनगरमध्येच उपचार सुरु होते आता मात्र बीड जिल्ह्यातील गेवराई आणि माजलगाव या तालुक्यातील कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईवरून विना परवाना बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. या दोन रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केली आहे.आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे.यामुळे आता बीड जिल्ह्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

बीड: स्त्री जातीचे अर्भक सापडले ; परळी तालुक्यातील दैठणाघाट येथील प्रकार

परळी वैजनाथ दि.१३:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील दैठणाघाट येथील स्मशानभूमीच्या परिसरामध्ये स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली असून बाळाच्या रडण्यामुळे लोकांचे लक्ष गेल्याने वाळाचे प्राण वाचले आहेत. सदर बाळाला उपचारासाठी धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.

परळीपासून १८ ते २० किलोमिटर अंतरावर असलेल्या दैठणाघाट या गावातील स्मशानभूमीच्या जवळ असलेल्या झुडपांमध्ये नुकतेच जन्मलेले अर्भक फेकुन देण्यात आले होते. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज जबळच सुरू असलेल्या एका बांधकामावरील लोकांना ऐकावयास मिळाल्यानंतर मिस्त्री व मजूरांना झुडपांकडे धाव घेऊन पाहीले असता कसलाही कपड़ा अंगावर नसलेले जीवंत स्त्री जातीचे अर्भक रडत असल्याचे त्यांना दिसून आले.

सदर लोकांनी याची माहिती आशा वर्कर असलेल्या कल्पना भागवत गुट्टे या महिला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून बाळाला झुडपातून बाहेर काढत त्याला कपड्यामध्ये गुंडाळून धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. विशेष म्हणजे सदर बाळाचे वजन हे दोन किलोच्या आसपास असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे सदर बाळाचा जन्म हा ९ महिन्यानंतरच झालेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर बाळ हे १२ ते १५ तासात जन्मलेले असावे असा अंदाज लावला जात आहे.

तालुक्यातील मौजे दैठण घाट येथील समस्यानभुमी परिसरातील झाडी झुडपातून सकाळी मुलीच्या रडण्याचा आवाज बाजूच्या लोकांना आला. त्याठिकाणी नागरीकांनी धाव घेतली असता. त्यांना जिवंत मुलगी आढळून आली. रात्रीच्या दरम्यान अज्ञात मातेने या स्त्री जातीचे अर्भक फेकून दिले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मुलगी अनैतिक जन्मातून जन्मली की मुलगी झाली म्हणून फेकून दिली या बाबतची चर्चा गावात होत असून मुलीस धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

ऊसतोड मजूर घरी परतले ,२८ दिवस होमक्वारांटाईनच काय झालं ,मोफत किराणा किट ग्रामपंचायतच्या घशात का ? – डॉ ढवळे

अजित कुंभार साहेब यांच्या आदेशाचे पालन कोण करणार ?

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश, मौजे ससेवाडी , मौजे बेलगांव , मौजे सोमनाथ वाडी , मौजे पोखरी , मौजे अंजनवती , येथिल दलित समाजातील आणि दुर्बल घटकातील तसेच ज्यांची दबुन राहण्याची मानसिकता आहे ते वगळता इतर सर्व जण ज्यादिवशी साखर कारखान्यावरुन आले त्याचदिवशी आपापल्या घरी गावात रहायला गेले होते. केवळ अधिकारी तपासणीसाठी आले तर दाखवण्यासाठी म्हणुन या लोकांना गावठाणाबाहेर ठेवण्यात आले होते.

अजित कुंभार यांच्या २८ दिवस गावाच्या हद्दीत,गावठाणाबाहेर या आदेशाचे पालन कोण करणार ? – डॉ.गणेश ढवळे यांचा सवाल

दि. ०५/०५/२०२० रोजी जिल्हा परिषद बीड(वैयक्तिक शाखा )क्र.मुकाअ/वैशा/१३/२०२० बीड या आदेशानुसार संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना शासन आदेशानुसार जिल्ह्यात परत आलेल्या ऊसतोड मजूर कुटुंबांना कोविड १९ आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्र्वभूमीवर मोफत अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तुंच्या किटचे वाटप करणेबाबत यामध्ये नमुद करताना या मजुरांना परत आल्यानंतर स्वत:च्या गावच्या हद्दीत २८ दीवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार असुन त्यांना त्यामुळे कोणताही रोजगार करता येणार नाही.या कालावधीत त्यांची उपासमार होऊ नये या उद्देशाने जिल्हा परिषदेने स्वत:च्यासन२०२०-२१च्या स्वनिधितुन या कुटुंबियांना अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तुंच्या किटचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यात त्यांनी समिती नेमुन१) संनियंत्रण अधिकारी २) सरपंच ३) उपसरपंच ४) व ५) गावातील दोन नागरीक पैकी एक महीला ( शक्यतो ऊसतोड मजूर)६) पोलिस पाटील कींवा शासकीय कर्मचारी ७) ग्रामसेवक यांनी शासकीय प्रक्रियेचा अवलंब करून एका अन्नधान्य कीटची अधिकतम कींमत वाहतुकिसह रक्कम रु.६५०/-इतकी निश्र्चित करण्यात आली असुन ग्रांमपंचायतींनी रू.६५०/- वा कमी कींमतीत या कीटची खरेदी करावी. यामध्ये समाविष्ट वस्तु १) तांदूळ कोलम ५किलो ,२) सोयाबीन तेल १लिटर ३)साखर १किलो ४)तुरदाळ उच्च प्रतिची १ कीलो ५)आयोडीन युक्त बारीक मिठ १ किलो.६)मिरची पावडर २००ग्राम ७)हळद पावडर १००ग्राम ८) कांदा, लसुण,मसाला २०० ग्राम ९)जिरे १००ग्राम १०) मोहरी १०० ग्राम ११) साबण अंगाचा ( किमान ७५ ग्राम ) लाईफ बाय , डेटांल १ नग १२) साबण कपड्याचा किमान( ७५ ग्राम ) व्हिल १ नग आणि जिल्हा परिषद मार्फत पुरविण्यात येणारे हन्डबिल / पाम्पलेट प्रत्येक किट मधे टाकले जाईल याची खातरजमा गटविकास अधिकारी व संनियंत्रण अधिकारी यांनी करावी असे लेखी आदेश दिले आहेत.

वस्तुस्थिती आणि विपर्यास

” वस्तुस्थिती अशी आहे की ९० टक्के ऊसतोड मजूर साखर कारखान्यावरुन आलेल्या दिवशीच स्वत:च्या गावातील घरी राहण्यास गेले होते. ” – डॉ गणेश ढवळे

सरपंच यांनी विरोध न करण्याची कारणे :

१) सरपंच यांना भविष्यात मतदान मागण्यांसाठी अडचण येऊ नये म्हणून त्यांना विरोध केला नाही.
२) बरेच सरपंच हे ऊसतोड मजुरांचे मुकादम यांच्या ( म्हणजे ग्रांमपंचायत निवडणुकीत पैसा खर्च करणे) जीवावर सरपंच झाले आहेत

ग्रामसेवक / तलाठी यांनी विरोध न करण्याची कारणे:

१) त्यांना जिल्हाधिकारी बीड यांनी दिलेल्या आदेशानुसार ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
२) आपणास दररोज या गावांना बीड वरून येऊन भेटी द्याव्या लागतील.
३) आपणास जिल्हाधिकारी बीड यांनी दि. २३/०४/२०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार मुख्यालयी रहावे लागेल.

१४ दिवसानंतर मोफत किराणा किट वाटप करून घरी पाठवणे :

अजित कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी २८ दिवस होम क्वारंटाईन कालावधी लेखी दिलेला असताना १४ दिवसात मोफत किराणा किट वाटप करून घरी पाठवणे यामध्ये ग्रांमपंचायत नंतर येणारा निधी तुम्ही तुमच्याच घरी राहतात म्हणून पुढील निधी जिल्हा परिषद प्रशासनाने दिलाच नाही हे कारण सांगून त्यांना निधी न वाटता ज्या प्रमाणे १४ वा वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार केला जातो तसाच या निधिचा अपहार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वरील प्रक्रियेचे पालन न करणे तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधितांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येऊ शकते.


पालावरचं जगणं महाग झालं ,२ रुपयाला हंडाभर पाणी विकत घ्यावं लागतं, जिल्हा प्रशासनाने उपासमार थांबवावी– डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे चौसाळा येथिल गोरे इंग्लिश स्कूल शेजारी घारगांव रोडला वास्तव्य करीत असलेल्या
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भटक्या विमुक्त जमातींच्या अथवा पालावर राहणा-या मुर्ति बनवणा-या अथवा भिक्षा मागून पोट भरणा-या गोरगरीबांची पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेबांनी जिल्हा प्रशासनाने ऊसतोड मजुरांसाठी दिलेल्या निधीतून जेवणाची सोय करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

सलमा शेख, मुर्तिकार:

आमचा मुर्ति बनवण्याचा व दारोदारी हिंडून विकण्याचा धंदा आहे, लाकडाऊन मुळे धंदा बंद आहे, लेकरांबाळांची उपासमार होत आहे, पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते .

रुखसाना ,मुर्तिकार:

पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते २ रु ला हंडाभर पाणी शेजारील बोअरवेल वरुन आणावे लागते. शौचालयासाठी उघड्यावर जावे लागते, १० दिवसांपूर्वी दोन वेळा सरपंच यांनी धान्य , भाजीपाला आणून दिले होते, परंतु ते म्हणतात, आम्ही किती दिवस देणार, सरकार जेवणासाठी निधी देत नाही,आम्ही जि.प.सदस्य अशोक लोढा अध्यक्ष असलेल्या सामाजिक संस्थेतर्फे खर्च करत आहोत.

भिक्षा मागणारे :

आमचा धंदा दारोदारी हिंडून भिक्षा मागून पोट भरण्याचा आहे, संचारबंदी लागू झाल्यामुळे दारोदारी फिरायची बंदी आहे, कोरोना महामारी मुळे लोकं भिक्षा देण्यासाठी सूद्धा जवळ येत नाहीत.आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारने आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड:

पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांनी ज्या प्रमाणे ऊसतोड मजुरांची मोफत किराणा किट देण्याची ग्रामविकास विभागामार्फत निधी मंजूर केला तर याच निधितून ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील पालावरील लोकांना पिण्याचे पाणी, शौचालय आणि जेवणाची सोय करण्यात यावी, अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री , अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेल व्दारे केलेली आहे.


#fruitizm पुण्यातील ‘फ्रुटीजम्’ घेणार आता शेतकऱ्यांचा भाजीपाला ; अन्नदात्याला संकटाच्या काळात मदतीचा हात

आठवडा विशेष टीम― अवघ्या काही दिवसातच सर्व जगाला आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोनानं फक्त महामारीचं संकट आणलं नाही तर सर्व जग लॉकडाउन करून टाकलं. कालपर्यंत धावणारं जग आज एकाएकी ठप्प झालं. या सगळ्या परिस्थितीत भारतानं या कोरोनाला हरवायचं ठरवलं. प्रत्येक भारतीय नागरिकानी आपली सोशल डिस्टंसिंगची जवाबदारी ओळखली आणि घरात स्वतःला बंद करून घेतलं. म्हणूनच भारत आज बऱ्याच प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालाय. पण याची झळ भारतात प्रत्येकाला बसली. अगदी सामान्य वाटणाऱ्या सेवासुद्धा मिळेनाश्या झाल्या. जीवनावश्यक वस्तूंची तूट निर्माण झाली. सर्वात मोठा फटका अन्नदात्या शेतकऱ्याला बसला. माल आहे पण विकणार कसा? एकीकडे शेती उत्पादनं, विशेषतः भाज्या फळे, गिर्हाईक नाही म्हणून वाया जात आहेत, तर दुसरीकडे नागरिकांना या सर्व वस्तू मिळवण्यासाठी खटपट करावी लागत आहे.
ही सामाजिक नड ओळखून, पुण्यात यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या ‘फ्रुटीजम्’ fruitizm.com (पायसम फूड सर्विसेस प्रायवेट लिमिटेड ) कंपनीनं एक उपक्रम हाती घेतला आहे . हा उपक्रम अगदी सोपा, पण अत्यंत प्रभावी ठरत आहे. शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा, म्हणजे त्यांचा माल वाया जाणार नाही व त्यांचे नुकसान होणार नाही आणि शहरात विविध ठिकाणी लोकांपर्यंत तो पोहोचवायचा. पायसम फूड सर्विसेस प्रायवेट लिमिटेड (‘फ्रुटीजम्’) कंपनी या पूर्वी फक्त फळे आणि आणि त्याच्या पासून तयार केलेली ज्युसेस यांचे घरपोच सुविधा देत होती. पण कोविड १९ मुळे जपावा लागणार सोशल डिस्टंसिंग लक्षात घेता कंपनीने भाजीपाला आणि किराणा मालहि घरपोच पोहचवण्याठी सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना रास्त दरात जीवनावश्यक वस्तू पोहोचवणे शक्य झाले आहे. फ्रुटीजम् कंपनी याच क्षेत्रात पूर्वी पासून कार्यरत असल्यामुळे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचे सर्व आवश्यक उपाय येथे केले जातात. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते.
कंपनी चे संचालक श्री. दिप भोंग यांनी शेतकरी बांधव तसेच गृह उद्योजक व महिला याना आवाहन केले आहे शिवाय त्यांनी कंपनीचे भविष्यातील विस्ताराबाबत माहिती दिली सर्व शेतकरी बांधवाना कंपनी तर्फे आवाहन करण्यात आले आहे कि त्यांनी कंपनीशी संपर्क साधून त्यांनी त्यांचे कडे उपलब्ध असलेल्या फळे भाजीपाला या विषीयी नोंदणी करावी.
तसेच सर्व गृह उद्योजक व महिला उद्योजक कडून हि कंपनी त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ घेऊन ते भारतीय व भारता बाहेरील बाजारपेठे मध्ये उपलब्ध करणार आहे. त्यांना आपले खाद्यपदार्थ आता कंपनीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत .त्यांना हि कंपनीशी संपर्क (७२१९११५८५८) साधून रजिस्टर होता येईल अशी माहिती देण्यात आली.
फ्रुटीजम्’ कंपनीने काही वर्षातच पुणे शहरात विस्तार केला आहे आणि मागणी व कंपनीची कार्यक्षमता बघता, आता देशांतर्गतच नव्हे तर देशाबाहेरही विस्तार करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. सर्वांना बरोबर घेऊन मोठे होण्यास कंपनीने सदैव प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देशात व देशाबाहेर केल्या जाणाऱ्या निर्यातीचा, बाजारपेठेत असलेल्या या मंदीच्या काळात सर्वांनाच फायदा होईल. देशाबाहेरील निर्यातीसाठी कंपनीने APEDA रेजिस्ट्रेशन व आवश्यक सर्व तरतुदी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक अडचणी शिवाय यशस्वी व फायदेशीर निर्यात होऊ शकेल.

पायसम फूड तर्फे पुणे ,मुंबई ,नागपूर ,नाशिक या शहरात फ्रॅंचाईजी देण्यात येणार असून त्या मार्फत लवकरात लवकर घरपोच सेवा देता यावी यासाठी कंपनी प्रयन्तशील आहे शिवाय कंपनी बंगलोर चेन्नई हैद्राबाद या शहरात लवकरच त्यांचे स्टोअर्स सुरु करणार आहे.
हा कंपनीचा उपक्रम फक्त नफ्यासाठी नसून सामाजिक जाणिवेतून उभा केला आहे. सर्वांनाच फायद्याचा आणि मदतीचा असल्यामुळे हा उपक्रम बहुउद्देशीय आहे. सरकारच्या COVID-19 विरोधी लढ्यात हा खारीचा वाटा आहे, आपल्या अन्नदात्याला संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे, महिला आणि गृह उद्योजकांना या लॉकडाउनच्या काळात विकासाची संधी आहे. सर्व जनतेला कोणत्याही खाद्यपदार्थाची नड भासू नये, अगदी भाजी व फळांपासून ते चविष्ठ लोणच्यांपर्यंत कोणतीही गरज लवकर आणि अतिशय काळजीने हाताळण्यात येणाऱ्या घरपोच सेवेने व्हावी असा हा उपक्रम आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्व जण एकत्र येऊन, येणाऱ्या आर्थिक मंदीवर मात करू शकतो. हा उपक्रम देशात व देशाबाहेर यशस्वी करून त्याचा लाभ संपूर्ण भारताला करून देऊ शकतो. या उपक्रमासाठी आणि अशा अनेक नवीन उपक्रमांतून सर्वांचा विकास साधण्यासाठी फ्रुटीजम्’ कंपनी नेहमी तत्पर आणि प्रयत्नशील आहे असे कंपनीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळेचे सामाजिक भान ; संपूर्ण पाथरा गावास वाटले मास्क

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना साथरोगाच्या संकटकाळी आपली जबाबदारी ओळखून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम समाजात काही मोजके लोक,संस्था,संघटना, आस्थापना करीत आहेत.आपल्याकडे काही नसताना ही इतरांना मदत व सहकार्य करण्याचा दातृत्वपणाचा गुण फार कमी लोकांमध्ये पहावयास मिळतो.असेच लोकहिताचे काम सातत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासी आश्रमशाळा करीत आहे.सामाजिक भान व बांधिलकी जोपासत या शाळेने संपूर्ण पाथरा गावास मास्क दिले … Read more

अखेर पोखरी दलित वस्ती ऊसतोड मजुरांची भुक जियो-जिंदगीनेच भागवली ,भाकरी पुरवण्याची हमी विठ्ठल घरत यांनी दिली ―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल दलित वस्तितील ५० ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करून देण्यास , सरपंच , ग्रामसेवक, तलाठी ,आशा व आरोग्य सेवक यांनी नाकारल्यानंतर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मदतीने जियो-जिंदगीचे विठ्ठल तात्या घरत , रामचंद्र शिंदे, खंडु सगळे यांनी भाकरी देऊन भविष्यात सुद्धा तुमची उपासमार होऊ देणार नाही अशी हमी दिल्याने ऊसतोड मजूर भावनिक झाले ,या जिल्हाप्रशासनापेक्षा साखर कारखानदार बरे होते निदान जनावरांना चारा आणि माणसांना नियमित राशन देत होते, आमच्याच गावात आम्ही परके झालो आहोत.

दिक्षा भोसले (ऊसतोड मजूर महिला ९ महिने गरोदर )

आम्ही परवा सायंकाळी गावात पोहोचलो त्यावेळी आशा व आरोग्य सेवक यांनी माझा फक्त फोटो काढून नेला.तपासले नाही , जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार दररोज तपासणी सांगितली असताना सुद्धा आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुद्धा कोणी आले नाही, ग्रामसेवकाने शुद्ध पिण्याचे पाणी , शौचालय , विद्युत पुरवठा अशी कोणतीही सोय केली नाही. आज सकाळी सुद्धा लांबुनच पाहून गेले. ईथल्यापेक्षा साखर कारखाना बरा होता रोज डांक्टर तपासणी , आठवड्याला राशन गहु , तांदूळ, तेल ,तिखट ,मिठ ,अंगाची साबण ,कडीपेटी सकट देत होते.

विठ्ठल तात्या घरत (जियो-जिंदगी सदस्य )मो.नं. ८२०८११०९०३

आम्हाला वाटत होतं परगावचे मजुर ज्याचं इथं कोणी नाही तर यांना भाकरी द्यावी , गावातील ऊसतोड मजुरांचे नातेवाईक आणि गावातील लोक त्यांच्या जेवणाची सोय करतील परंतु वस्तुस्थिती खुपच भयानक असून यांच्या भाकरीची सूद्धा जबाबदारी आज पासून जियो-जिंदगी घेत आहे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड :

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांनी ऊसतोड मजुरांचे पालकत्व स्विकारावे आणि बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या जेवणाची म्हणजेच कीराणा, राशन , भाजीपाला यांच्यासाठी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अथवा ईतर निधितून तरतुद करावी.यासाठी मा.राहूलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री’ अन्न पुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलव्दारे पाठवले आहे.


#CoronaVirus पंकजाताई मुंडे यांनी बाहेरगावी राहणाऱ्या परळीतील गरजूंनाही पोहोचवले रेशन

ताई, ‘तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय…आम्हीच कमी पडलो’! नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

परळी दि. २२:आठवडा विशेष टीम― केवळ परळी शहरातीलच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी शहरांत रोजगार आणि कामधंद्यानिमित्त वास्तव्यास असलेल्या परळी मतदारसंघातील गरजू नागरिकांनाही पंकजाताई मुंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रेशन व जीवनावश्यक वस्तू पोहोच केल्या. या मदतीने भारावून गेलेल्या रहिवाशांनी ताई, ‘तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय…आम्हीच कमी पडलो’! अशा भावना व्यक्त केल्या.

कोरोनामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत आपल्या माणसांना मदत व्हावी यासाठी पंकजाताई मुंडे सध्या विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. साखर कारखाना परिसरात अडकून पडलेल्या लाखो ऊसतोड कामगारांना त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज सुरक्षितपणे घरी जाता आले आहे. प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाखाची मदत असो की गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील गरजूंना रेशनचे वाटप असो, त्यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.

बाहेरील गरजूंना रेशन

परळी मतदारसंघातील अनेक लोक मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी भागात रोजगार अथवा छोटे व्यवसाय करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवतात अशा रहिवाशांना सध्या कोरोनाचा फटका बसला आहे. संचारबंदीमुळे सर्व काही बंद आहे, त्यामुळे त्यांचेकडील असलेले अन्नधान्य संपले, अशा संकटकाळात त्यांनी पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधला आणि क्षणाचाही विलंब न करता पंकजाताईनी त्यांच्यापर्यत रेशन व आवश्यक वस्तू पोहोचविल्या. नागपिंप्री येथील दत्तू सांगळे, बाबूराव मुगले, ज्ञानेश्वर ढाकणे आदी सिन्नर येथे रहातात. मुंबईच्या जासई, उरण, पनवेल आदी ठिकाणी हाळम, हेळमचे हनुमंत दहिफळे, शिवाजी दहिफळे, ज्योतीराम गुट्टे, माधव होळंबे आदी १८ कुटुंब, पुण्याच्या औंध, सांगवी येथे वडखेल येथील वास्तव्यास असलेल्या २५ कुटूंबिय या सर्वांपर्यंत पंकजाताई मुंडे यांनी रेशन पोहोचविले.

ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच कमी पडलो!

पंकजाताई मुंडे यांनी पाठवलेली मदत मिळाल्यानंतर रहिवाशांना आपल्या भावना अनावर झाल्या. ‘ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच चुकलो, सरकार असताना तुम्ही आमच्यापर्यंत किती पोहोचवत होतात आणि आता सरकार नसतांनाही तुम्हीच देत आहात, आम्हीच कमी पडलोत’ अशा शब्दांत कुटूंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


परळी विभागात 23 एप्रिल पासून कापूस खरेदी सुरू होणार ―राज्य उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके, संचालक राजकिशोर मोदी यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― परळी विभागातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये गुरूवार,दि.23 एप्रिल पासून पुन्हा कापूस खरेदी सुरू करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी, भारत चामले यांनी दिली आहे. 2014-15 ते 2019 पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारात शासनाच्या हमीभावा पेक्षा जास्त भाव होता.2018- 19 साली … Read more

संचारबंदी काळात सिरसाळा येथील पोलीसांना झालेल्या मारहाणीतील आरोपींना जामिन मंजुर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― संचारबंदी काळात सिरसाळा (ता.परळी) येथे बुधवार,दि.25 मार्च 2020 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पो.नाईक किशोर कचरू घटमाळ व पो. नाईक जेटेवाड हे कोरोना संचारबंदीचे काळात वडार गल्ली सिरसाळा येथे गेले असता तुकाराम बाबु पवार यांचे घरासमोर पुरूष व महिलांची गर्दी जमलेमुळे त्यांना घरात बसा व संचारबंदीचे नियम पाळा असे पो.ना.घटमळ यांनी राम तुकाराम पवार व इतरांना सांगत असताना अचानक 1) राम तुकाराम पवार,2) श्रीराम बाबु पवार, 3) अशोक तुकाराम पवार, 4) विकास अर्जुन मिटकर, 5) राजु राम लष्करे, 6) विशाल मिटकर, 7) सोनाली राम पवार, 8) सोजरबाई तुकाराम पवार, 9) पप्पु श्रीराम पवार यांनी व इतर 3 जणांनी पोलीस नाईक घटमल व जेटेवाड यांना लाकडाने,विटाने व दगडाने मारहाण केली.त्यात पोलीस ना.घटमल व जेटेवाड हे गंभीर जखमी झाले अशी फिर्याद पो.स्टे. सिरसाळा यांनी बुधवार,दि. 25/03/2020 ला दिल्यावरून त्याची नोंद फा.क्र.63/2020 प्रमाणे गुन्हा कलम 353,307, 332,336,143,147, 149,323,504,506, 188,आय.पी.सी.व कलम 51 (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे नोंद झाला.वरील आरोपींना 25/10/2020 रोजी सुमारे 10 वाजता अटक केली.परळी न्यायालयाने त्यांना दिनांक 26/03/2020 ते 06/04/2020 पर्यंत पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर 16/04/2020 पर्यंत व पुढे न्यायालय कोठडी दिली आहे.वरील सर्व आरोपींविरुध्द पोलीस सिरसाळा यांनी खोटा गुन्हा दाखल केला.सकृत व प्रथम दर्शनी आरोपींविरूद्ध दाखल केलेला आरोप चुकीचा आहे.वैद्यकीय अहवालही संशयास्पद आहे.उलट आरोपीस पोलीसांनी मारहाण केलेच आरोपीचे म्हणणे आहे. आरोपीनी गुन्हा केला नाही. इत्यादी प्रकारची ठोस बाजुचा मे.जिल्हा व सत्र न्यायालयासमोर युक्तीवाद करून पोलिसांनीे सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद आहेत.आरोपींना जामिनवर सोडण्याची मागणी अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी केली.असता मे.सत्र न्यायालयाने वरील सर्व आरोपींना 15 हजार रूपयांचे जामीनवर मुक्त करण्याचे आदेश देवून सर्वांनी दर सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत पो.स्टे.सिरसाळा येथे हजेरी लावणेचा आदेश ही दिला आहे.
संचारबंदी व कोरोना परिस्थितीतील सदरील घटना ग्रामीण भागातील असलेमुळे त्यावेळी राज्यभर दुरदर्शनवर व वर्तमानपत्रात खुप गाजलेली आहे.सदर प्रकरणात आरोपींची बाजु अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके , अ‍ॅड.रणजित सोळंके, अ‍ॅड.एस.ए.पांचाळ, अ‍ॅड.रामेश्‍वर जाधव, अ‍ॅड.शिवराज साळुंके यांनी पाहिली आहे.


#CoronaVirus बीड: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे शिधापत्रिकाधारक व स्वस्त धान्य दुकानदार यांचे साठी आवाहन

बीड,दि.२१:आठवडा विशेष टीम― रेशन कार्ड ( शिधापत्रिका ) पोर्टेबिलिटीसाठी दुकानदारांच्या अंगठ्याचा सॉफ्टवेअरमध्ये बंद करण्यात आला आहे. पोर्टेबिलिटी म्हणजे रेशन कार्ड धारक कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य मिळवू शकतो. परंतु रेशनकार्ड धारक अजूनही अंगठा वापरुन रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा घेऊ शकतात. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जेव्हा कार्ड धारकाचा अंगठा वापरला जातो तेव्हा स्वस्त धान्य … Read more

गरीब माणूस उपाशी झोपणार नाही,याची काळजी घेणार–जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख ; अंबाजोगाईत शिवभोजन केंद्राची सुरूवात

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात शासकीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असुन त्याचे उदघाटन बीड जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.उद्घाटक म्हणून बोलताना आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील गरीब व गरजू माणसांपर्यंत शासकीय योजना आणि यंञणा प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत.शक्य तिथे गरजूंना वैयक्तिकरीत्या ही मदत करीत आहे.गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी घेणार असल्याचे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.

शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात शनिवार,दिनांक 18 एप्रिल रोजी शासकीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असुन त्याचे उदघाटन बीड जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,तहसिलदार संतोष रूईकर,मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव सिरसाट,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे,यशवंतराव चव्हाण चौक येथील शिवभोजन केंद्राचे संचालक काकासाहेब जामदार आणि योगेश देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की,कोरोनाच्या संकट काळात गरजुंना शासकीय शिवभोजन केंद्र सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडीची महात्वाकांक्षी शिवभोजन योजना यापुर्वी फक्त जिल्हा स्तरांवर होती.मात्र कोरोनाच्या या संकटात गोरगरीब व गरजूंना दिलासा देण्यासाठी तालुका स्तरांवर ही योजना आता राबविण्यात येत आहे.त्यानुसार तहसिलदार, मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने शहरात यशवंतराव चव्हाण चौक,सदर बाजार चौक व रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शिवभोजन केंद्र नियुक्त केले आहेत.त्यापैकी यशवंतराव चव्हाण चौक येथील काकासाहेब जामदार आणि योगेश देशमुख यांना केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली.या केंद्राचे आज उद्घाटन झाले आहे.लॉकडाऊन काळात परस्थितीने गांजून गेलेले लोक,हातावर पोट असलेले विविध समाज घटक यांना मोफत भोजन वितरण करण्यात येत आहे.या भोजन व्यवस्थेवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहोत.काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेऊत.अंबाजोगाईत शिवभोजन मोफत योजना हा उपक्रम अतिशय चांगला व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे असे सांगून शहरात शिवभोजन केंद्र सुरू झाल्याने अनेक गरजुंना आधार मिळणार असून जनसामान्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे.

200 लोकांच्या मोफत भोजनाचे दिले पैसे

कोरोना संकटकाळात लॉकडाऊन कालावधी वाढवल्याने समाजातील वंचित,गरीब,गरजूंना किमान मोफत भोजन मिळावे या विधायक भूमिकेतून बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट व जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी प्रत्येकी 100 लोकांचे असे एकूण 200 शिवभोजन थाळीचे पैसे देवून शिवभोजन मोफत भोजन उपक्रमास माणुसकीच्या नात्याने मदत केली.


सरपंचाच्या आडमुठेपणा मुळे महाजनवाडीकरांच्या घशाला कोरड ,पाणी पुरवठा विहीरीवरील स्टाट्रर ,फ्युज सुद्धा गायब ―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेणारे प्रसंगी स्वत: बोअरवेल घेऊन गावाला पाणी पाजणारे आपण पाहीले परंतु केवळ गावाला वेठीस धरण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध असुनही गावाला तहानलेलेच ठेवण्यात समाधान मानणारे महाजन वाडी गावचे आडमुठे सरपंच निराळेच.यासंबधी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री , पाणीपुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य … Read more