कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील जनतेसाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या कार्याचा आढावा

बीड:आठवडा विशेष टीम―

कोरोनाच्या काळात बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी केलेल्या कार्याचा आढावा पुढीलप्रमाणे आहे.

१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीची नियुक्ती

२) खरीप हंगामातील कर्ज वाटपसाठी जिल्ह्यातील सर्व बँके अधिकारी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे संवाद साधून प्रश्न सोडवला,

३) दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान व दुधाची भुकटी साठी पन्नास रुपये अनुदान राज्य सरकार विरोध आंदोलन

४) कोरोनाच्या काळात वाढीव वीज बिल व कृषीपंपाचे वीज बिल माफ करण्यासाठी आंदोलन,

५) प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून बीड जिल्ह्यातील रूग्णालयाला 74 वेंटिलेटर दिले

६) श्री क्षेत्र गहीनाथगडच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपूरला हेलिकॉप्टर पाठवण्यासाठी पाठपुरावा केला,

७) बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य मंत्री यांच्या कडे पाठपुरावा केला

८) जिल्ह्यातील कापूस हारभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या तसेच फळबागाचे प्रलंबित अनुदान साठी कृषी मंत्र्यांकडे यांच्या कडे पाठपुरावा

९) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना येणाऱ्या शैक्षणिक आडचणीची स्वतः डॉ आसल्याने विद्यार्थीनी सोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून माहिती घेतली ,

१०) कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बीड जिल्हा आरोग्य विभागाची आढावा बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली व काही महत्वाच्या सूचना केल्या.

११) बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर आज बीड शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

१२) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी २४३ कोटी रुपये व कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी उपलब्ध करून दिला ४७३ कोटी रुपयांचा निधी मिळाला या साठी पाठपुरावा केला होता

१३) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील वयोवृद्ध,विधवा व दिव्यांग निराधारांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत केंद्र सरकारने दिला ५८ कोटींचा निधी या साठी पाठपुरावा

१४) केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.राज्यातील प्रधानमंत्री जनधन योजनेच्या लाभार्थ्यांना कोरोना महामारीच्या संकट काळात मदत करण्याकरिता केंद्र सरकारने ६४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला पाठपुरावा केला

१५) मा.पंकजाताई मुंडे आदेशवर गोर गरिबी जनतेला कोरोनाच्या काळात घरगुती किराणा किटचे वाटप ,

१६ ) जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्त दान शिबीराचे आयोजन

१७) बीड जिल्ह्यात रेशन दुकानातून मोफत तांदूळ व सर्व रेशन माल वाटप बाबत कार्यकर्ते द्वारे लक्ष व त्याचा अधिकारी कडून वेळोवेळी आढावा घेतला

१८) बीड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रमुख कार्यकर्ते यांनी व आरोग्य विभाग मार्फत 1 लाख लोकांची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमेटर द्वारे तपासणी केली आहे

बीड जिल्ह्यात खा.डॉ .प्रितमताई मुंडे यांच्या या पाच महिन्यात कोरोनाच्या महामारीत बीड जिल्ह्यात विविध समस्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्री मोहदय यांच्या कडे पाठपुरावा केलेला आहे .

वरील योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घरा पर्यत व घरातील व्यक्तींना कुठल्या न कुठल्या योजना लाभ मिळालेला आहे.

(शब्दांकण ― धनंजय घोळवे)

#मोठी बातमी…पंकजा मुंडेंची केंद्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार ?

दिल्ली/वृत्तसंस्था:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रातील विधानसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असल्याचे सूत्रांकडून समजते. दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे ,विनोद तावडे या दिग्गज नेत्यांसह शेलार व निलंगेकर यांना देखील स्थान मिळण्याचं निश्चित झाले आहे. याबाबत सूत्रांकडून विशेष माहिती मिळत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार असल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान , एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा गोपिनाथ मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

गोपिनाथ मुंडेंची कन्या प्रितमताई मुंडे यांची महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष पदी निवड

बीड दि.०४:आठवडा विशेष टीम स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची कन्या बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात नेणाऱ्या स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्येवर ही प्रमुख जबाबदारी दिल्यामुळे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.सोशल मीडिया सह इतर माध्यमांवर फक्त डॉ प्रितम मुंडे यांचेच नाव चर्चेत आले आहे.

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या ६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज गंगाखेड येथे रक्तदान शिबीर संपन्न

गंगाखेड दि.०३:आठवडा विशेष टीमसध्या कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासकीय रक्तपेढ्याकडे रक्तसाठा कमी झाला असुन मा.पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान श्रेष्ठदान यांचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि सुरक्षित पद्धतीने रक्तदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून कोणत्याही प्रकारची गर्दी होऊन न देण्याची काळजी घेऊन, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आले आहे.

आज नोंदणीकृत 82 व्यक्तींनी रक्तदान करून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना अभिवादन केले.वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेऊन रक्तदान केल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार जनसेवक रामप्रभु ग्यानदेवराव मुंढे यांनी मानले आहेत.

गंगाखेड तालुक्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांना व क्वारटाईन केलेल्या नागरिकांना ३० ब्लॅंकेट – (चादर) व ४० बकेट हे साहित्य S.D.M.सुधीर पाटील व तहसीलदार सौरभ कंकाळ यांच्या कडे देण्यात आले आहेत.लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संघर्षाच्या अग्नितूनही बाहेर निघणार ; फक्त तुमची साथ पाहिजे–पंकजाताई मुंडे यांचा फेसबुकवरून ‘लाईव्ह’ संवाद

मुंबई दि.०३:आठवडा विशेष टीम― मी खचले नाही. स्वाभिमानी असणं हे सन्मानाचं लक्षण आहे. पराक्रम, परिश्रम, सत्य आणि संघर्ष ही शस्त्रे घेऊन भविष्याची वाटचाल करणार आहे, मला फक्त तुमची साथ हवी आहे, संघर्षाच्या अग्नितूनही आपण बाहेर निघू आणि अत्यंत आत्मविश्‍वासाने वाटचाल करू असे सांगत तुम्ही राहणार ना माझ्यासोबत ? अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला. वंचितांना न्याय देण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न मला पूर्ण करायचयं, मी उतणार नाही, मातणार नाही असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त पंकजाताई मुंडे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून विविध मुद्द्याद्वारे संवाद साधला. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी समर्पित सेवेचा यज्ञ करण्याचे आवाहन केले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आजचा दिवस काळाने आपल्यावर आणलेला आहे. आपल्या महत्वाच्या व्यक्तीला आजच्या दिवशी आपण गमावलं आहे. म्हणून ३ जून आपल्यासाठी काळा दिवस आहे. मुंडे साहेबांचे संस्कार असे होते की, हरायचे नाही, लढायचं, रुकायचे नाही, कोणापुढे कधीही झुकायच नाही, हे मुंडे साहेबांनी आपल्या सर्वांना शिकवले. मुंडे साहेबांच्या या शिकवणूकीला अनुसरुन जो जो संघर्ष करतो त्यासाठी हा एक प्रेरणा दिन आहे. मला आज खूप दु:ख होतय. कारण मी आज मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेवू शकले नाही. आज मुंबईत वादळाची स्थिती असल्याने नेटवर्क नाही, अशा नेटवर्कच्या समस्या अनेकदा येतात, पण तुमच्या माझ्यातील कनेक्शन कोणीही तोडू शकत नाही. मुंडे साहेबांच्या अनेक आठवणी आहेत.

सामान्य माणसांसाठी लढणारा व्यक्ती म्हणजे मुंडे साहेब होते. लोकांसाठी मी संघर्षयात्रा काढली. मुंडे साहेबांच्या मृत्यूची उद्विग्नता सार्‍यांमध्ये दिसत होती. मुंडे साहेबांची विचारधारा घराघरांपर्यंत पोहचवून भाजपची सत्ता लोकांनी आणली. मी सत्तेत गेले तेव्हा खूप लोकांना आनंद झाला. मंत्रालयाचा मजला दुमदूमून जात होता. ९० टक्के लोकांचे प्रश्‍न सोडवले, मात्र १० टक्के लोकांचे प्रश्‍न मी सोडवू शकले नाही, त्याबद्दल त्यांची मी क्षमा मागते, ती खंत माझ्याही मनात आहे असेही पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. मी पराभवाने निराश होणारी नाही, गोपीनाथ मुंडेंचे रक्त माझ्यात आहे. आज माझ्यावर प्रेम करणार्‍यांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. पंकजा मुंडे आता काय करतील, पंकजाताईंचे राजकारणात स्थान काय? पंकजाताई आम्हाला भेटतील का? किंवा पक्षात पंकजाताईंचे स्थान काय? असे अनेक प्रश्‍न लोकांच्या मनात आहेत. पण माझ्या मनात एकही प्रश्‍न नाही. कारण माझ्याकडे प्रचंड आत्मविश्‍वास आहे की तुम्ही माझ्यासोबत असाल तर कोणतेही रणांगण माझ्यासाठी कधीही धोक्याचे असणार नाही. कारण तुम्हीच माझी कवचकुंडले आहेत.

नव्याने सुरवात करायची

पंकजा मुंडे दगाबाज असू शकत नाही. मी पक्ष सोडणार, आमुक तारखेला निर्णय जाहिर करणार असं सांगितलं जातं, मी असा काही निर्णय घ्यावा यासाठी हे केले जाते, पण विश्‍वास ठेवू नका, पंकजा मुंडे पक्ष सोडणार हे तुम्ही ठरवणारे कोण? पंकजा मुंडे काय करणार? हे पंकजा आणि कार्यकर्ते ठरवतील.
मी खचलेले नाही, मी करोनामुळे घरात आहे. प्रशासनाने मला विनंती केली. त्यामुळे मी गोपीनाथगडावर आले नाही.आपल्या लोकांना काही होवू द्यायचे नाही, सर्व जण सुरक्षित रहावेत म्हणून मी गोपीनाथगडावर आले नाही.तुम्हाला जरी वाटत असले की पंकजाताई काय करतात, पण मी खचून जाणार नाही, आपण नव्याने सुरुवात करायची आहे. भाजपामध्येच गोपीनाथ मुंडेंनी निवडणूक लढवली, पराजय झाला पण ते खचले नाहीत. आमदार म्हणून निवडून आले, शेतकर्‍यांच्या घरात जन्मलेले मुंडे साहेब देशाचे ग्रामविकास मंत्रीपदापर्यंत पोहचले हा इतिहास आहे.

स्वाभिमानी असणं सन्मानाचं लक्षण

सत्तेत असतानाही मला अनेकदा संघर्ष करावा लागला मात्र मी कधीही खचले नाही. परळीच्या पराभवाची चर्चा झाली पण परळीच्या विजयाची चर्चा झाली नाही. राजकारणात पराभव हा चाखावा लागतो. पराभवातूनच शिकता येते. मोठे नेते पराभूत झाले. माझ्या पराभवातून मी दुसर्‍या दिवशी बाहेर पडले, तुम्ही बाहेर पडणार आहात का? असा सवाल करत पंकजाताई म्हणाल्या, स्वाभिमानी असणं हे सन्मानाचं लक्षणं आहे. पद आणि प्रतिष्ठा माणसाला मोठे बनवते. मात्र काही माणसे असे असतात जे पद आणि प्रतिष्ठेला मोठे बनवतात. मला काही नाही पाहिजे, मला केवळ तुमची गरज आहे.

मी जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सामान्य माणसांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संवाद करते. सर्वपक्षीयांशी मी संवाद ठेवला आहे. सत्तेत नसताना सरकारशी संवाद साधून लोकांचे प्रश्‍न सोडवण्याचे माध्यम आज आपल्याकडे आहे.त्यासाठी मी प्रयत्न करतेय.पंकजाताई म्हणाल्या,आपण सर्वांनी अत्यंत आत्मविश्‍वासाने समाजात वावरायचे आहे. आता राजकारणात बदल झालेला आहे. मीडिया, सोशल मीडिया पॉवरफुल झालेला आहे. लोकांना वाट बघायची सवय राहिलेली नाही, पण नेता तो असतो, जो परिस्थितीच्या अधिन न जाता संयमाने निर्णय घेतो, वाटचाल करतो, तुम्ही सर्व जण माझ्या पाठीशी आहेत हा विश्‍वास मला प्रेरणा देतो. मी स्वत:च्या स्वार्थासाठी काही मागत नाही. प्रत्येकाला चांगली अन् वाईट वेळ येत असते. कारण तीच खरी परीक्षा असते, अशा काळात चांगुलपणा सोडू नये असेही त्यांनी सांगीतले.

सेवेच्या यज्ञात समर्पितपणे काम करु

कोरोनाच्या संकटात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने राज्यात अनेक भागात सेवेचा यज्ञ सुरु केला, त्या सर्वांचे मी खूप आभार मानते. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. या सेवेचा यज्ञात तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. तुमचा हात माझ्या डोक्यावर असल्याशिवाय मला दुसरे काही नको. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्न केला, आणि भविष्यातही करत राहिल. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर मी माझ्या मनावर दगड ठेवून काम करु शकते तर मी तुमच्यासाठी आयुष्य खर्ची घालू शकते असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

शांततेतच निर्णय घेता येतात

अनेकजण म्हणाले, ताई तुम्ही शांत का? पण शांततेतच निर्णय घेता येतात. शांतेततूनच भविष्याची प्लॅनिंग करता येते. मला आणि माझ्या घरच्यांना कोणत्याही पदावर जाण्याची लालसा नाही. मला तुम्हाला पदावर बसण्याची इच्छा आहे. तुम्हाला न्याय देता येईल यासाठी काम करायचे. भाषण करायची सवय तुटली म्हणून तुमच्याशी संभाषण करतेय. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सेवेचा यज्ञ सुरु केला आहे. सामान्य माणूस, अबला, नारी, झगडणारा तरुण, शेतकरी या सर्वांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

मी जे कमावलं ते तुमच्यामुळेच

तुमच्या आशिर्वादाने मी जगत आहे, मी जीवनात खूप काही गमावलंय ते कायमचं. पण जे कमावलं ते तुमच्यामुळेच. गोपीनाथगड आता आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. आज तिथे आपण येवू शकलो नाही पण गड आपल्या घरी आला. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सार्‍यांनी घरातूनच साहेबांना अभिवादन केले. सकाळपासून अनेकांचे फोन आले. मुंडे साहेबांच्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत. त्यांच्या प्रतिमेसमोर दिवे लावले, त्यांना अभिवादन केले असे असंख्य लोकांनी सांगितले.


कोरोना काळात देखील बीड जिल्ह्यातील लोक म्हणतायेत…जिल्ह्याला लाभलेलं नेतृत्व ‘पंकजा मुंडे’च

आठवडा विशेष टीम―संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याला आटोक्यात आणण्यासाठी किती प्रयत्न केले जात आहेत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.ठाकरे सरकार ह्या कठोर काळात यशस्वी होईल की नाही याची शाश्वती आज कोणीही देऊ शकत नाही.परंतु प्रशासन देखील कोरोना विरुद्ध लढाईत तितक्याच जोराने काम करत आहे.बीड जिल्ह्यात देखील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.त्यावर लगाम घालण्यासाठी स्थानिक प्रशासन आवश्यक ते निर्णय घेत आहे.एकीकडून धनंजय मुंडे तर एकीकडे पंकजा मुंडे असे चित्र राजकारणाच्या पटलावर आहे.धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत.ते बीड जिल्ह्याच पालकत्व कशाप्रकारे निभावतात याकडे लक्ष लागले आहे.परंतु जनतेतुन आता भाजपा सरकार असायला हवे होते असाही आवाज बाहेर पडायला लागला आहे त्यामुळे पुन्हा पंकजा मुंडे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील जनता पंकजाताई मुंडे यांच्या कार्यप्रणालीला जास्त भर देत आहे.आज पंकजाताई मुंडेच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असायला हव्या होत्या असा आवाज आता सामान्य जनतेतुन यायला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातल्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मंत्री असताना बीड जिल्ह्याचा कायापालट केला.बीड जिल्ह्याला आजपर्यंत चांगले रस्ते पाहायला मिळाले नव्हते ते रस्ते पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वामुळे पाहायला मिळाले हे सत्य आपल्याला मानाव लागेल.पंकजाताई मुंडे यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून कार्य पाहताना बीड जिल्ह्यातील जनतेला कसल्याच प्रकारे वंचित ठेवले नाही.शेतकऱ्यांना कधी पाहायला न मिळेल एवढा पिकविमा त्यांनी मंत्री असताना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मिळवून दिला.शेतकऱ्यांचा कैवारी काय असतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिले होते.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा करणे ,दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे पुण्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.याउलट भाजपा सरकार गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने बीड जिल्ह्यासाठी काही केले आहे का हा प्रश्न जनतेने स्वतःला विचारावा.

पंकजाताई मुंडेंसोबतच त्यांच्या बघिनी खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांनी देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्याचे मूळ प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम केले आहे.पंकजा मुंडे यांचे बंधू समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी आहेत.त्यांच्याकडून देखील बीड जिल्ह्याचा विकास व्हावा या आशेवर सामान्य जनता आहे.


पंकजा मुंडे समर्थ आहेत महाराष्ट्र भाजपाच नेतृत्व करायला…!

आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मध्ये सध्या ओबीसी विरोधी घटना घडत असल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्यावर जनतेतून एकच आवाज उठत आहे पंकजा मुंडे ह्याच आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करू शकतील.भाजपा मध्ये गट बाजी कोणामुळे पडली हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे.खडसे ,तावडे आणि त्याचसोबत पंकजा मुंडेंना डावलून ह्यांना काय सिद्ध करायचे होते तेच कळत नाही.? भारतीय जनता पार्टीच्या एका नेता-कार्यकर्त्यांच्या फळीने पंकजाताई मुंडे यांचच नेतृत्व स्वीकारलं असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय स्तरावर सुरू आहे.पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार सारख्या योजना दुष्काळी भागात आणल्या त्याचा भरमसाठ फायदा देखील शेतकरी वर्गाला झाला ते ओळखून आता शेतकरी देखील पंकजा ताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायला लागला आहे.

आघाडी सरकार कडून शेतकऱ्यांच्या लाभासाठी भारदस्त अशा योजना सुरू केल्या गेल्या नाही.केवळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकरी राजा सुखावत नसतो.ह्याचा मोठा फायदा भारतीय जनता पार्टीला भविष्यात होणार आहे.भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र ते सध्याच्या नेतृत्वाला शक्य झाले नव्हते. मात्र आता हीच वेळ आहे पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपाला पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये ऊदयास आणण्याची.

‘वाघांनो रडू नका’ पंकजाताई मुंडेंनी कार्यकर्त्यांना केलं भावनिक ट्वीट

मुंबई:वृत्तसंस्था― राज्यात विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल (८ मे) भाजपने विधापरिषदेच्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. यात रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, प्रवीण दटके या ४ उमेदवारांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मात्र, विधानपरिषदेच्या यादीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये दुःख झाले. “वाघांनो असे रडताय काय मी आहे ना”, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत त्यांच्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे.
पंकजा मुंडेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असे रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!”

#CoronaVirus पंकजाताई मुंडे यांनी बाहेरगावी राहणाऱ्या परळीतील गरजूंनाही पोहोचवले रेशन

ताई, ‘तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय…आम्हीच कमी पडलो’! नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

परळी दि. २२:आठवडा विशेष टीम― केवळ परळी शहरातीलच नव्हे तर मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी शहरांत रोजगार आणि कामधंद्यानिमित्त वास्तव्यास असलेल्या परळी मतदारसंघातील गरजू नागरिकांनाही पंकजाताई मुंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रेशन व जीवनावश्यक वस्तू पोहोच केल्या. या मदतीने भारावून गेलेल्या रहिवाशांनी ताई, ‘तुम्ही सरकार असताना खूप काही दिलयं, आताही देताय…आम्हीच कमी पडलो’! अशा भावना व्यक्त केल्या.

कोरोनामुळे राज्यात सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत आपल्या माणसांना मदत व्हावी यासाठी पंकजाताई मुंडे सध्या विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. साखर कारखाना परिसरात अडकून पडलेल्या लाखो ऊसतोड कामगारांना त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज सुरक्षितपणे घरी जाता आले आहे. प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाखाची मदत असो की गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील गरजूंना रेशनचे वाटप असो, त्यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे.

बाहेरील गरजूंना रेशन

परळी मतदारसंघातील अनेक लोक मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर आदी भागात रोजगार अथवा छोटे व्यवसाय करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवतात अशा रहिवाशांना सध्या कोरोनाचा फटका बसला आहे. संचारबंदीमुळे सर्व काही बंद आहे, त्यामुळे त्यांचेकडील असलेले अन्नधान्य संपले, अशा संकटकाळात त्यांनी पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधला आणि क्षणाचाही विलंब न करता पंकजाताईनी त्यांच्यापर्यत रेशन व आवश्यक वस्तू पोहोचविल्या. नागपिंप्री येथील दत्तू सांगळे, बाबूराव मुगले, ज्ञानेश्वर ढाकणे आदी सिन्नर येथे रहातात. मुंबईच्या जासई, उरण, पनवेल आदी ठिकाणी हाळम, हेळमचे हनुमंत दहिफळे, शिवाजी दहिफळे, ज्योतीराम गुट्टे, माधव होळंबे आदी १८ कुटुंब, पुण्याच्या औंध, सांगवी येथे वडखेल येथील वास्तव्यास असलेल्या २५ कुटूंबिय या सर्वांपर्यंत पंकजाताई मुंडे यांनी रेशन पोहोचविले.

ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच कमी पडलो!

पंकजाताई मुंडे यांनी पाठवलेली मदत मिळाल्यानंतर रहिवाशांना आपल्या भावना अनावर झाल्या. ‘ताई, तुम्ही चुकला नाहीत, आम्हीच चुकलो, सरकार असताना तुम्ही आमच्यापर्यंत किती पोहोचवत होतात आणि आता सरकार नसतांनाही तुम्हीच देत आहात, आम्हीच कमी पडलोत’ अशा शब्दांत कुटूंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


ऊसतोड कामगारांना घरी पोचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असतांना झारीतले शुक्राचार्य कोण? – पंकजाताई मुंडे

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे आक्रमक

मुंबई दि. १५:आठवडा विशेष टीम― ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोचविण्याच्या प्रश्नांवर पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत. कामगारांना घरी पोचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असतांना विलंब होत असल्याने झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल करत कामगारांचा संयम सुटू देऊ नका, लवकर निर्णय घ्या असे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे, या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत, हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली आहे, परंतु निर्णयास विलंब होत असल्याने पंकजाताई मुंडे आक्रमक झाल्या आहेत.

यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी ‘ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या, त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या.ते एका ठिकाणी पंधरा दिवस आहेत. जे ठणठणीत आहेत ते ही आजारी पडतील पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहेत. आज एक दोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जवाबदार ?? रॅडम टेस्ट करा हवं तर पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा, ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील ..त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत. एकही साधा शिंकला नाही मग काय चिंता आहे?..त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य??.आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा, हा विषय राज्याच्या अधिकारात आहे.’ असे म्हटले आहे.