अंबाला दि.०५: सर्जिकल स्ट्राईक द्वारे दाखविलेल्या शौर्याबद्दल भारतीय सैन्याचा प्रधानमंत्री मोदी गौरव करतात. भारतीय सैन्याच्या पराक्रमावार प्रत्येक भारतीयाचा विश्वास आहे. मात्र काँग्रेस ने सर्जिकल स्ट्राईक चे पुरावे मागून सैन्याचा अवमान केला आहे.सैन्याच्या कामगिरीचे श्रेय मोदी घेत नाहीत ते केवळ सैन्याचा गौरव करतात तसाच गौरव काँग्रेसनेही करावा.भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव मोदी करत असतील तर काँग्रेस च्या पोटात का दुखते असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारला आहे.
हरियाणा येथील गोमतीनगर मध्ये अंबाला लोकसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ऍड अनिल कुमार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. पाकिस्तानला आणि पाकपूरस्कृत दहशतवादाला कायमचा धडा शिकविण्याची राजकीय इच्छाशक्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदींमध्येच आहे.असे ना रामदास आठवले म्हणाले.
दलितांच्या संरक्षणासाठी ऍट्रोसिटी कायद्या अधिक सक्षम करणारा वटहुकूम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणला तसेच सवर्णनांमधील गरिबांना 10 आरक्षण देणारा कायदा संसदेत मोदींनी संमत केला. त्यामुळे देशभरातील दलित आणि सवर्ण नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी मतदान करीत आहेत. हरियाणा मधील दलित सवर्ण सर्व समाजाने मोदिंच्या नेतृत्वातील एनडीए च्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.
हरियाणा मध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा असून त्यात 1 जागा रिपब्लिकन पक्ष लढत असून अन्य 9 जागांवर भाजप ला रिपाइं चा पाठिंबा देण्यात आला आहे. या निवडणुकीत हरयाणातील लोकसभेच्या किमान 8 जागांवर भाजप चे उमेदवार विजयी होतील. हरियाणा मध्ये मोठया प्रमाणात दलित मतदार असून रिपाइं च्या पाठिंब्याने हरयाणातील दलित भाजपला साथ देतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री मोदी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे काम चांगले असून त्याचा फायदा भाजप उमेदवारांना मोठया प्रमाणात होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी आज गोमतीनगर जिल्हा अंबाला येथे व्यक्त केला.