आज माध्यमिक विद्यालय तांबाराजुरी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला
पाटोदा (प्रतिनिधी) दि.२३: आज माध्यमिक विद्यालय तांबाराजुरी शाळेत यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य अॅड.कवठेकर दादा बोलत होते. यावेळी त्यांनी उच्च शिक्षणांसह विविध उद्योगांची माहिती व मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटोद्याचे नायब तहसीलदार गणेश जाधव साहेब, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष दिपकराव तांबे तात्या ,डोमरीचे राजाभाऊ भोंडवे , रियाज भैय्या शेख , आय.बी.एम. न्यूज चॅनलचे सय्यद सज्जाद भाई व कॅमेरामन राहुल सोनवणे , गोकूळ डिसले , अंकुश तांबे सर, पोपटराव तांबे , मोहनराव तांबे , मुख्याध्यापक सानप सर , गणेश मधुकरराव तांबे , पत्रकार राम तांबे , गणेश बापूराव तांबे , लक्ष्मण तांबे , श्रीकृष्ण तांबे , हरिभाऊ तांबे सर, बबन पवार सर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी पालक शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, प्रमुख पाहुण्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंगुळे सर आणि विद्यार्थीनी आरती चौरे व पल्लवी अनिल तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन भुजबळ सर यांनी केले.