परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजशैक्षणिक

ना.अजित पवार,ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वॉट्सअॅप मेसेजद्वारे 10 वी,12 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन–चेतन सौंदळे

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान वॉट्सअॅपद्वारे 10 वी,12 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन करणार असल्याची माहिती परळी नगर परीषदेचे नगरसेवक तथा शिक्षक समुपदेशक चेतन सौंदळे यांनी दिली आहे.

सध्यास्थितीत कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे राज्यातील/ जिल्हयातील सर्वच घटकांवर परिणाम झालेला आहे.तसेच शाळा,महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे सामाजिक,भावनिक व मानसिक आरोग्य चांगले रहावे त्यांच्या मनातील भीती, ताण व नैराश्य दूर करून त्यांना शिक्षणाविषयी व इतर बाबतीत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी मो.क्र.9422930599 व समुपदेशक श्री.सुनील गर्जे मो.क्र.9075401097 यावर वॉट्सअॅप मेसेजद्वारे विद्यार्थी, पालक संपर्क करून मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतात.
1 मे 2020 रोजी दहावीचा कलचाचणी अहवाल www.mahacareermitra.in या वेबसाईटवर व mahacareermitra app वर जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा विद्यार्थी आपला कल व अभिक्षमता अहवाल याविषयी समुपदेकांशी विनामूल्य मोबाईलद्वारे संपर्क साधून करिअर क्षेत्राविषयी माहिती प्राप्त करू शकतात.
तसेच महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी www.mahacareerportal.com या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सरल आयडी व 123456 हा पासवर्ड टाकून लॉग इन होता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना करियरविषयी माहिती (५५० हून अधिक करीयर्स), कॉलेज डिक्शनरी (२१००० हून अधिक कॉलेजेसची माहिती), परीक्षा डिक्शनरी (११५० हून अधिक प्रवेश परिक्षांची माहिती), स्कॉलरशिप, स्पर्धा आणि फेलोशिप डिक्शनरी (११२० हून अधिक शिष्यवृत्त्या ) या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल. तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी असे आवाहन समुपदेशक चेतन सौंदळे व सुनील गर्जे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button