पाटोदा तालुकाबीड जिल्हा

अनाधिकृतपणे सेतू चालवून जनतेची लूट करणाऱ्या सेतू चालकावर प्रतिबंधात्मक कारवाई करा―बाबासाहेब गर्जे

पाटोदा (प्रतिनिधी) दि.२५ : पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारात अनधिकृतपणे सेतू सेवा केंद्र चालवून कामा साठी येणाऱ्या सर्व सामान्य जनतेकडून अवाच्या सव्वा पैसे घेऊन राजरोसपणे लूट करणाऱ्या संबंधित चालकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी पाटोदयातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब गर्जे यांनी पाटोदा तहसीलदार यांना दिलेल्या तक्रारी निवेदनात केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की पाटोदा तहसील च्या आवारात जुन्या पंचायत समिती सभागृहाच्या बाजूला असलेल्या खोलीत चालू असलेले सेतू केंद्र हे अनाधिकृत असून त्या सेतू केंद्राला पाटोदा तालुक्यातील दुसऱ्याच गावाची सेतू चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सदरील सेतू हा पाटोदा येथे चालू असून ज्या ठिकाणी परवानगी आहे त्याच गावी तो चालवावा असे शासनाचे निर्देश असताना हे सेतू केंद्र पाटोदा येथे आणि ते ही तहसील च्या आवारात कसे काय चालू आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील सेतू चालका कडून सेतू केंद्रात कामासाठी आलेल्या लोकाकडुन अव्वाच्या सव्वा पैशाची आकारणी करून दिवसाढवळ्या जनतेची लूट चालविली आहे. कोणत्या कामासाठी किंवा प्रमाणपत्रासाठी किती फि घ्यावी हे ठरवून दिलेले असताना आणि तसा भाव फलक सेतूच्या बाहेर लावणे बंधनकारक असताना अशा प्रकारचा कोणता ही फलक येथे लावलेला नाही किंवा फि घेताना ती नियमाप्रमाणे न घेता सर्व सामान्य जनतेची लूट केली जात आहे. या बाबत माननीय तहसीलदार साहेबांनी यांची शहानिशा करावी, आणि संबंधित सेतू चालका वर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. अन्यथा वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येईल व आंदोलनात्मक मार्गातून सेतू केंद्र बंद करण्यास भाग पाडावे लागेल. याची नोंद घ्यावी असे ही दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनात बाबासाहेब गर्जे यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.