[the_ad id=”10155″] पाटोदा दि.१९:आठवडा विशेष टीम―भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या दिनांक 20 जुलै रोजी मांजरसुंबा रोड वरील विधुत महावितरण कार्यालयासमोर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना केलेल्या अवाजवी वीज बीलाच्या विरोधात वीज बिलाची होळी करून झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी हालगी बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा लोकप्रिय खासदार डॉ प्रितमताई मुंडे ताईसाहेब यांच्या आदेशावरून व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी बीड जिल्हाध्यक्ष मा. रमेश भाऊ पोकळे, भाजपा बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे, भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सभापती, उपसभापती, बुथ प्रमुख ,शक्तीकेंद्र प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख नागरिक यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती भाजपा पाटोदा तालुकाध्यक्ष ऍडव्हाकेट सुधीर घुमरे यांनी केली आहे.
0