परळी:आठवडा विशेष टीम― शहरातील पद्मावती शिक्षण संस्थेची संस्कार शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगिन विकासाला केंद्रबिंदू मानत नाविन्यपूर्ण असे शैक्षणिक संस्कृतिक तथा विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व संघर्षयोद्धा तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाढदिवस सेवा सप्ताहानिमित्त शाळेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या नवनीत पब्लिकेशन चे अतिशय महागडे असणारे TOP SCORER हे सॉफ्टवेअर शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी अगदी मोफत देणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार व सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आधार महोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवादरम्यान सामाजिक जाणिवेतून विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटाने अख्खे जग ग्रासले असून सर्वच ठिकाणी व परळीत देखील कोरोना चे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे आधार महोत्सवाच्या ऐवजी या दोन्ही लाडक्या नेत्यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे या सेवा सप्ताहात देखील विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत
आज मितीस सर्वत्र कोविड 19 संक्रमणाचे संकट असून सर्व जग जणू ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे याचा शैक्षणिक क्षेत्रासही मोठा फटका बसला असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्था तात्पुरत्या स्वरूपात सध्याच्या घडीला तरी बंदच आहेत. दरम्यान सर्वत्र ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा अवलंब केला जात असून हीच बाब लक्षात घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या काळजी पोटी परळी शहरातील नावाजलेल्या पद्मावती शिक्षण संस्थेच्या संस्कार शाळेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवस सेवा सप्ताहानिमित्त संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या नवनीत पब्लिकेशन चे अतिशय महागडे असणारे TOP SCORER सॉफ्टवेअर आपल्या शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्षभरासाठी पूर्णतः मोफत देण्याचे ठरविले असून ही या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून एक अनमोल भेट ठरणार आहे या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मार्ग अधिक सुखकर होण्यास मदत मिळणार असून घरबसल्या शिक्षण प्राप्त करण्यास ही मदत मिळणार असल्याची माहिती शाळेच्या व्यवस्थापनाने दिली आहे
दरम्यान नेहमीच आपल्या शालेय विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक तथा सामाजिक उन्नतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या संस्कार शाळेमध्ये सदैव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीकोनातून नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले जातात याअगोदरही शाळेच्या व्यवस्थापनाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत व्हिडिओ टिचिंग व व्हाट्सअप चा वापर करत आधुनिक पद्धतीने ऑनलाइन शिक्षण दिले आहे. परंतु आता आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केलेल्या नाविन्यपूर्ण असणाऱ्या नवनीत च्या या TOP SCORER सॉफ्टवेअरमुळे व्हिडिओच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संकल्पना तथा प्रश्नावली समजून घेण्यास मदत मिळणार असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची निर्माण होण्यासही मदत मिळणार आहे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या संस्कार शाळेच्या व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद इतर स्टाफ व मुख्यत्वे संस्थेचे सचिव दीपक तांदळे यांचे पालक वर्गातून आभार व्यक्त केले जात आहेत या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१५०० विद्यार्थ्यांना मिळणार लाभ–
शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नवनीत पब्लिकेशन चे हे TOP SCORER सॉफ्टवेअर अतिशय उच्च दर्जाची शिक्षण प्रणाली राबवते. यामुळे विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना समजून घेण्यात मदत मिळेल व अभ्यासही अधिक सुकर होईल व अभ्यासातील रुची ही वृद्धिंगत होईल या सर्वच बाबींचा विचार करून हे सॉफ्टवेअर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकरीता आगामी वर्षभरात करिता अगदी मोफत देत असून पहिली ते सातवी च्या जवळपास 1500 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
– दिपक तांदळे, सचिव संस्कार शाळा परळी वै