मुंबई दि.२३ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १२ हजार १०६ गुन्हे दाखल झाले आहेत. ३१ हजार ४७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २२ जुलै या कालावधीत
अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख २९ हजार ८८३ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१६ (८८१ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०८ हजार १११
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ९०
(मुंबईतील ४८ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५२, ठाणे शहर ८ व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,नवी मुंबई SRPF १,पालघर २,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १,
औरंगाबाद शहर १,जालना ग्रामीण १, नवी मुंबई १)
कोरोना बाधित पोलीस – २०१ पोलीस अधिकारी व १५१९ पोलीस कर्मचारी