पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील आयएसओ मानांकन प्राप्त गुणवंत शाळा जरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु. सिद्धी बिभिषण चाटे हिने ऑनलाइन ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धे’त ‘टॉप वन’ क्रमांक प्राप्त केला आहे.
Covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर आहे; दरम्यान, पाटोदा तालुक्यातील उच्च गुणवत्ता प्राप्त आयएसओ मानांकन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी या शाळेतील विविध वर्गाच्या शिक्षकांच्या माध्यमातून दररोज ऑनलाइन अभ्यासक्रम दिला जातो. संबंधित शिक्षक ते पाहतात आणि आपला शेरा तसेच मार्गदर्शन करतात. तसेच सह्याद्री वाहिनीवरील तासिका अटेंड केल्या बाबतची ही नोंद घेतली जाते.
या शाळेच्या वतीने बुधवारी ‘सुंदर हस्ताक्षर स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा आज निकाल घोषित करण्यात आला. यात इयत्ता ६ वी ची विद्यार्थिनी कु. सिद्धी बिभीषण चाटे ही ‘टॉप वन’ क्रमांकाची मानकरी ठरली.
या समवेतच प्रजित घायाळ, पृथ्वीराज पवार, सायली धुमाळ, समृद्धी पवार, अमृता येवले, सना शेख, ऋषिकेश पवार, अभिषेक पवार, कार्तिकी गुंजकर, सई बेद्रे, श्रेया गुजर, प्रथमेश भोगल, भक्ती पवार, वैष्णव दगडे, सिद्धी कोळपकर, धनश्री पवार, यश जेधे, सार्थक उंडे, कृष्णा जायभाये, आणि राजश्री जेधे आदी विद्यार्थीही ‘अभिनंदन पत्रा’ स पात्र ठरले आहेत.
मुख्याध्यापक कदम तसेच राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखालील ‘निवड समिती’ ने ही निवड केली.
दरम्यान, या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेच्या सर्व शिक्षक बांधवांनी केले आहे.
–