पाटोदा दि.२४:नानासाहेब डिडुळ― पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा आणि मौजे थेरला येथिल हुतात्मा स्मारकांच्या दुरूस्ती निधीतील अपहार प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांनी दिले आहे.
दि. २३/०७/२०२० सकाळी १० वा हुतात्मा बाबुराव धोंडीबा राख यांच्या हुतात्मा स्मारकास भेट
हुतात्मा स्मारकाचा उपयोग दारूडे आणि जुगारी राजरोसपणे करतायेत त्यांचे सर्वप्रथम आभार ,ते देत अलेल्या योगदानाबद्दल दरमहा पगार त्यांना शासनाने द्यायला हवी,कारण ते नसते तर हुतात्मा स्मारके खंडहर झाली असती. त्यांना शासनाने मोफत दारु आणि पत्याचे नवेकोरे पुरवणे बंधनकारक करावे.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिन, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला ग्रामपंचायतीला स्मारकाची आठवण
शासकीय नियमानुसार हुतात्मा स्मारकाची नियमित रोज देखभाल म्हणजेच साफसफाई ग्रामपंचायतीच्या कर्मचा-याने करणे बंधनकारक आहे, कर्तव्य म्हणून नाही तर पगारी सेवक म्हणून तरी परंतु ग्रांमपंचायत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, १ मे महाराष्ट्र दिन ,१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी जाग येते आणि फुलांच्या माळा आणि भक्तिगीते लाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा सोपस्कार पार पाडला जातो.
हुतात्मा स्मारक दुरूस्ती कामातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी लेखी तक्रार –डॉ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे वाघीरा आणि मौजे थेरला येथिल मराठवाडा मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मारक दुरुस्तीसाठी पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा आणि मौजे थेरला स्मारकांच्या दुरूस्तीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये निधी वितरित करण्यात आला होता. परंतु ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने थातूरमातूर काम करून निधी हडप केला आहे,त्याची चौकशी करण्यात यावी ईस्टीमेटप्रमाणे काम केलेले आहे कि नाही याची खात्री करण्यात यावी याविषयी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.