सोयगाव,दि.२६(ज्ञानेश्वर धोंडू पाटील) :केंद्र शासनाच्या वतीने घोषणा करण्यात आलेल्या अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येवून रविवारी या योजनेचे जिल्हाभर उद्घाटन करण्यात आले,परंतु सन्मानित करण्यात आलेल्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उडाला आहे.कर्जमाफीप्रमाणे या योजनेचा फज्जा उडतो कि काय या विवंचनेत पात्र शेतकरी अडकला आहे.
सोयगाव तालुक्यात महसूल,कृषी,ग्रामसेवक आणि सेवासंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तालुकाभर शेतकऱ्यांची कुटुंबनिहाय माहिरी संकलित करून तब्बल तेरा हजाराच्यावर शेतकऱ्यांची नावे संबंधित संकेतस्थळावर अपलोड केली.या योजनेचा राविअव्री तहसील कार्यालयात शुभारंभ करण्यात आला यासाठी पहिल्या टप्प्यातील पंधरा शेतकऱ्यांचा योजनेचे पहिले लाभार्थी म्हणू सन्मानही करण्यात आला,परंतु दुसरा दिवस उजाडूनही खात्यावर रक्कम वर्ग न झाल्याने सोमवारी शेतकऱ्यांची बंकेभोवती गर्दी गोळा झाली होती.त्यातच रक्कम खात्यावर वर्ग झाल्याचे पाहणी करण्यासाठी आलेल्या सन्मानित करण्यात आलेल्या पंधरा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कमच वर्ग न झाल्याने या सन्मानित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची चेष्ठा करण्यात आल्याचा आरोप सन्मानित झालेल्या महिला शेतकरी मथुराबाई पाटील त्यांनी केला आहे.दरम्यान योजनेच्या शुभारंभप्रसंगी सन्मानित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यावर रक्कम वर्ग न झाल्याने उर्वरित पाते शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.ही योजना पहिल्याच दिवशी केवळ कागदोपत्री फार्स ठरली असल्याने कर्जमाफीचं योजनेप्रमाणे शेतकऱ्यांची गत होते कि काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
0