बुलढाणा, दि. १० : स्थानिक स्त्री रूग्णालयाचे कोविड समर्पित रूग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. सदर रूग्णालय टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अद्ययावत करण्यात आले आहे. या रूग्णालयाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सांकेतिक स्वरूपात फित कापून प्रत्यक्षात रूग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ.संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, जि. प सभापती रियाजखॉ पठाण, जि. प सदस्य रामभाऊ जाधव, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडीत, बुलढाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, मो. सज्जाद आदी उपस्थित होते.
फित कापून उद्घाटन केल्यानंतर रूग्णालयातील सुविधांची पाहणी मान्यवरांनी केली. आयसीयु कक्षाचे फित कापून उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. रूग्णालयातील सुविधांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्याहस्ते रूग्णालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच अन्य मान्यवरांच्या हस्तेसुद्धा वृक्षारोपण करण्यात आले.
दृष्टीक्षेपात कोविड समर्पित रूग्णालय :
एकूण खाटांची संख्या १११, तळमजला – ब्लड बँक, सोनोग्राफी रूम, लॅबोरेटरी रूम, एक्स रे रूम, मेडिकल स्टोअर्स, पहिला मजला – ऑपरेशन थिएटर्स ३, इमरजन्सी रिसेप्शन, फॅमिली प्लॅनिंग रूम १५ खाटा, आयसीयु ६ खाटा, एनआयसीयु १५ खाटा, पोस्ट ऑपरेटिव्ह रूम २५ खाटा, दुसरा मजला- पेडीॲट्रीक वार्ड १० खाटा, गायनिक वार्ड १० खाटा, फॅमिली प्लॅनिंग रूम १५ खाटा, पीएनसी १५ खाटा, आवार – ड्रेन, सम्पवेल/पंपहाऊस/ बोअरवेल, अंतर्गत रस्ते व पार्किंग व्यवस्था, उद्वाहन २,२०० केव्हीचा डिझेल जनरेटर सेट.