पाटोदा ( शेख महेशर ) दि.२८ : प्रत्येक नागरिकास तसेच शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांना कायद्या विषयी साक्षर व जागरूक करणे, विद्यार्थ्यांना कायद्याचे मुलभूत ज्ञान प्रदान करणे आवश्यक आहे, त्या मुळे मा.उच्च न्यायालयाने निर्देशित केल्या प्रमाणे पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे लिगल लिटरसी क्लब ची स्थापना करण्यात आली.या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची सखोल माहिती देण्यात येईल असे प्रतिपादन सहदिवाणी न्यायाधीश एम.व्ही. जावळे यांनी सोमवारी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाटोदा तालुका विधी सेवा प्राधिकरण पाटोदा व पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कायदे विषयक साक्षरता व जनजागृती साठी या क्लब ची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव हे होते. तर व्यासपीठावर वकील संघाचे अध्यक्ष अॅड.जब्बार पठाण अॅड. कांकरिया, अॅड.नागरगोजे, अॅड. लोंढे, अॅड.औटे, अॅड कोठुळे, उपप्राचार्य डॉ.म.द.क्षिरसागर,पर्यवेक्षक प्रा. रमेश टाकणखार इत्यादी ची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ.दत्तात्रय आघाव यांनी केला. प्रस्ताविक डॉ.म.द.क्षिरसागर यांनी तर सूत्रसंचालन डॉ.मनोजकुमार प्रकाश व आभार डॉ.महादेव मुंडे यांनी मानले. या वेळी कार्यक्रमास महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग व बहुसंख्यने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
0