अहमदनगर जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अहमदनगर जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर

अहमदनगर:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात काल (गुरुवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे७२.२१ टक्के इतके आहे.*
काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत ४० रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर १,अकोले ०९, नेवासा ०६, राहाता ०१, भिंगार ०१, नगर शहर १६, श्रीगोंदा ०१,नगर ग्रामीण ०१,श्रीरामपुर ०१,कोपरगाव ०३ रुग्णांचा समावेश होता. त्यानंतर आणखी १६ रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर ०७- देवाचा मळा ३, आश्वी बु.०१, घुलेवाडी ०३, अहमदनगर शहर ०३- गोविंदपुरा यशवंत नगर ०१, शहर ०१, आगरकर मळा ०१, नगरग्रामीण ०१ - नेप्ती ,पारनेर ०५- ढवळपुरी ०१, पाडळी दर्या ०१, तिखोल ०२, पारनेर ०१ आदी ठिकाणी रुग्ण बाधित आढळून आले.
अँटीजेन चाचणीत आज १४३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर २०, राहाता ०५, पाथर्डी १६, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपुर २१, कॅन्टोन्मेंट १७, नेवासा २६, कोपरगाव १५ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १२४, संगमनेर ०५, राहाता १०, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण ०५, श्रीरामपूर ०३, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले ०२, राहुरी ०२, शेवगाव ०१ आणि कर्जत येथील ०३ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ४११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२३, संगमनेर ५३, राहाता १८,पाथर्डी २, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २३, कॅन्टोन्मेंट १, नेवासा १०, पारनेर ७, राहुरी १०,शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: ३३६०
उपचार सुरू असलेले रूग्ण: १५४५
मृत्यू: ६८
एकूण रूग्ण संख्या: ४९७३
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.