परळी वैजनाथ (प्रतिनिधी)येथील वैद्यनाथ महाविद्यालयातील हिन्दी विभागाचे प्रा.हरिष मुंडे यांची नुकतीच कनिष्ठ महाविद्यालय हिन्दी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य औरंगाबाद विभागाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
यानिवडीबाबत प्रा.हरिष मुंडे राज्य अध्यक्ष प्रा.डॉ. मिलींद कांबळे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. प्रा.हरिष मुंडे वैद्यनाथ महाविद्यालयात हिन्दी विषयाचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थी प्रिय व मनमिळाऊ स्वभाव असणारे प्राध्यापक मुंडे यांच्या या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हिन्दी राष्ट्र भाषेचा प्रचार आणि प्रसार तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील हिन्दी भाषा संदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नावर आपण संघटनेच्या मार्फत काम करू असे ते म्हणाले. प्रा.हरिष मुंडे यांचे प्रा.पी.ए.कराड, प्रा.नारायण पाळवदे, प्रा.मनोज. फड, प्रा.अरूण ढाकणे, प्रा.रविकांत कराड व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
0