स्वच्छ ग्रामच्या पथकाकडून योगिता गवळीच्या कामाचे कौतुक
शिरूर कासार (प्रतिनिधी): दि.28 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता आभियान व संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम आभियान स्पर्धा चालु असून या स्पर्धामधे गोमळवाडा गावाने सहभाग घेतला असून गावाची तपासणी करण्यासाठी डॉ.पी.के. पिंगळे,श्री.तुकाराम पवार व श्री.संजय मिसाळ यांच्या पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली.यावेळी स्वच्छतादुत कु.योगिता आजीनाथ गवळीने केलेल्या कामाचे कौतुक करत ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
तालुक्यातील गोमळवाडा गावासह पांगरी,सांगळवाडी व शिरापुर येथे दि.28 रोजी भेट देऊन पाहणी केली.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता आभियान व संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा चालु असून या स्पर्धामधे गोमळवाडा गावाने सहभाग घेतला असून गावाची तपासणी करण्यासाठी डॉ.पी.के. पिंगळे (आरोग्यविभाग)श्री.तुकाराम पवार (शिक्षणविभाग) व श्री.संजय मिसाळ (स्वच्छ भारत मिशन अभियानचे जिल्हा समन्वयक व तालुका समन्वयक श्री.व्ही.एन.आगलावे यांच्या पथकाने अचानक भेट देऊन गावातील झालेल्या शौचालयाची कामे व इतर कामाची तपासणी केली व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली.यावेळी स्वच्छतादुत कु.योगिता आजीनाथ गवळी ने एवढया कमी वयात व शिक्षण चालु असताना आपल्या मैत्रीनिंना सोबत देऊन केलेले काम इतरांसमोर आदर्श ठेवणारे आहे असे सांगुन योगिताने केलेल्या कामाचे कौतुक करत ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी सरपंच सुदाम काकडे,उपसरपंच गणेश येवले,ग्रामसेवक दिलीप मिसाळ,मुख्याध्यापक आजीनाथ देशमुखसर,सुदाम पवारसर,माजी चे.भागवत दादा काकडे,बाबुराव सुरे,गंगाधर पाखरे,ग्रा.पं.सदस्य काकासाहेब जेधे,भिवाजी साळवे,महादेव पवार,श्रीमंत गर्जे,गणेश कातखडे,समिर पवार हारीभाऊ काकडे,विक्रम मुरगुंड,सुभाष कातखडे,अंकुश शिंदे,योगेश गवळी,बाबुराव माने,भक्तीदास गर्जे,रमेश महाडीक,नवनाथ बनकर,अंकुश गवळी,बाळु कातखडे,सखाराम खोपडे,यूवराज परदेशी,विश्वास मुरगुंड यांचेसह आदी ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने पथकातील सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर स्वच्छतादुत योगीता गवळीने गोमळवाडा येथे राबविलेल्या स्वच्छता आभियानच्या केलेल्या कामाबद्दल माहीती देऊन गाव जिल्हयात प्रथम येईल अशी अपेक्षा व्यक्त करून पथकासह सर्व उपस्थितांचे आभार मानले.