इस्लामाबाद (पाकिस्तान) : भारतीय जवान समजून ज्याला पाकिस्तानी नागरिकांनी बेदम मारहाण केली होती, त्या पाकिस्तानी विंग कमांडरचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला असून.त्या पाकिस्तानी विंग कमांडरचे नाव शाहजुद्दीन होते.पाकिस्तानात त्यांच्याच नागरिकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या विंग कमांडर शाहजुद्दीन यांच्यासाठी शोक व्यक्त केला जात आहे.
२६ फेब्रुवारी पहाटे साडेतीन वाजता भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर (एअरस्ट्राईक) १००० किलो बॉम्बचा हवाई हल्ला केला आणि तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने वायूसेनेची २० विमानं भारताच्या हद्दीत घुसवली होती. मात्र, भारताने ते पळवून लावली.
यावेळी अमेरिकन बनावटीच्या पाकिस्तानी एफ-१६ या विमानाला भारतीय जवानांनी पाडलं. मात्र, त्यातील पायलट असलेला पाकिस्तानी विंग कमांडर शाहजुद्दीन याने पॅराशूटच्या मदतीने उडी घेतली आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरला. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनी मात्र शाहजुद्दीनला भारतीय पायलट समजून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेतच जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तिथे शाहजुद्दीनचं निधन झाल आहे.