आता पुन्हा वेध लागतील त्या लोकसभा व विधानसभा निवडणूकिचे.उमेदवार आपली उमेदवारी स्वतःच जाहिर करतील.कोणतेही कार्यक्षेत्र नसलेल्या ठिकाणी उभे राहतील.निष्ठावंत पायघङ्या घालतील. कुणीही,कुणालाहि पाठिंबा देईल.विचारांची बांधिलकि इथही नव्हती आणि तिथही नव्हती,कुणाला काहिच वाटल जाणार नाही.वाईट म्हणजे कार्यकर्त्यानाही काहिच वाटणार नाही,ते फरफटत जातील.यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांची राजकिय रसद संपत चाललेली आहे. यामुळे चळवळितल्या कार्यकर्त्याकड़ून राजकारणाला मिळणारी वैचारिक रसद थांबली आहे.आपल्याच घरातल्या पै-पाहुण्याना आदन देण्याच सर्वपक्षीय काम निवड़णूकात होताना दिसेल.भविष्यात आपल्याला आव्हान देईल अस नेतृत्व निर्माण होईल याची योग्य खबरदारी घेतली गेली.
कार्यकर्ता तयार करावा अस कुणालाहि वाटेनास झालय.पुन्हा एकदा नव्याने घराणेशाहि/हुकूमशाही पुढे येत आहे.फक्त पैसेवालेच निवडून यावेत अशी कार्यपध्दती सुरू आहे.नेता हा पगारी कार्यकर्ता तयार करतोय/दारू पिण्यासाठी/हक्काचे लाचार यामुळे कार्यकर्ते नेत्यांचे “आश्रित”बनलेत.त्यांच्या बाजारू निष्ठाच भडक प्रदर्शन प्रखरपणे दिसून येत आहे.पूर्वी किमान निवडणूकापुरता तरी पैशापेक्षा कार्यकर्ता महत्वाचा असायचा.आता पैशाने हवे तसे कार्यकर्ते उभे करता येऊ लागले आहेत.तळागाळातील कार्तकर्त्याच महत्व संपुष्टात आल आहे.
नेता निवडून आल्याक्षणी कार्यकर्त्यांला काडिचिही किंमत देत नाही/वाऱ्यावर सोडून देतो.दोघेही एकमेकावंर विश्वास ठेवत नाहीत.नेत्याच्या वृत्तपत्र/टेलिव्हिजन /होर्डिंग्ज /इव्हेंट इतर जाहिरातीत सामान्य कार्यकर्ता दिसतच नाहि.दिसतो तो फक्त हुजरेगिरी,लाचारी करताना ते पण पगारीवरच……मागील अनेक वर्षात एकहि कार्यकर्ता सत्तेत नाहि.प्रस्थापित व पैसेवालेच व निष्ठा नसलेलेच निवडून आले आहेत
कोणतिही पात्रता नसताना केवळ पैशाच्या जोरावर निवड़ून आलेले कधीच कुणाच भल करत नसतात याच भान कार्यकर्त्याला अजून लक्षात येईना. शिक्षित मुलांनी राजकारणाच्या या बाजारपेठेत न जाता,स्वत:सक्षम आणि स्वाभिमानी कसे व्हावे याकडे लक्ष द्यावे.
―संजय रूपनर
7588289533