सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
आगामी गणेशोत्सव,पोळा आदी सण घरातच साजरे करून शांतता बाळगावी शासनाच्या नियमावलीप्रमाणे गणेश उत्सव साजरा करावा तसेच परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तातडीने सोयगाव तालुक्यात पोलिसांची वाॅश आउट मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तंबी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी शांतता कमेटीच्या बैठकीत बुधवारी दिल्या आहे.
सोयगाव पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी गाव तेथे शांतता कमेटी बैठकीचे नियोजन हाती घेण्यात आले यामध्ये जरंडी,निंबायती या दोन गावात झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी थेट छुप्या रीतीने अवैध धंदेवाईकांना कारवाईचा बडगा उगारला आहे.सोयगाव तालुक्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष वाॅश आउट मोहीम हाती घेण्यात येईल त्यासाठी सन उत्सव काळात शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.यावेळी बैठकीला दोन्ही गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी,सदस्य,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची उपस्थिती होती.