इस्लामाबाद : एअरस्ट्राईक नंतर आता एक मोठी बातमी हाती लागली आहे. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त विविध माध्यमातून समोर येत आहे.पाकिस्तानातील इस्लामाबाद इथं त्याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त सांगितले जात आहे. किडनीच्या आजाराने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती काही माध्यम दाखवत आहेत.मात्र अजूनतरी या वृत्ताबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.या वृत्ताला अद्याप पाकिस्तानकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.दिवसभरात अनेक वृत्तसंस्थांनी प्रयत्न करूनही या वृत्ताची खात्री पटू शकलेली नाही.