परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव सज्जाचे तलाठी विष्णू गित्ते यांची आदर्श तलाठी म्हणून निवड झाली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या वतीने दरवर्षी आदर्श तलाठ्यांची निवड करण्यात येते यावर्षी परळी तालु्नयातुन दादाहारी वडगाव तलाठी सज्जाचे तलाठी विष्णू गित्ते यांची निवड करण्यात आली असून विष्णू गित्ते यांनी दादाहारी वडगाव लोणी, सेलू, दगडवाडी सह अतिरिक्त सज्जा कन्हेरवाडी मध्ये उल्लेखनीय काम केले असून महसुल प्रशासनाच्या सर्व योजना राबविण्यासाठी महत्त्वपुर्ण भुमिका बजावली आहे. तसेच शेतकरी व नागरिकांना तलाठी म्हणून तत्पर सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे. गित्ते यांच्या महसुल विभागातील सेवेच्या कार्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन आदर्श तलाठी म्हूणन निवड केली आहे. या निवडीबद्दल मा उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक साहेब , तहसीलदार विपीन पाटील साहेब, नायब तह रुपणार साहेब, नायब तह डॉ वाघमारे मॅडम नायब तह मोरे मॅडम यांच्यासह सर्व कर्मचारी व तलाठी यांनी अभिनंदन केले आहे.
0