आठवडा विशेष टीम―
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेच्या संचालक स्मिता महाले, शल्यचिकित्सक कांचन वानेरे उपस्थित होते. आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र डहाणूचे नोडल अधिकारी डॉ. संजय चव्हाण, प्रयोगशाळेचे कृष्णा चैतन्ये, उपस्थित होते. आरोग्य विभागात कार्यरत जिल्हा सल्लागार डॉ. अमर खिराडे यांनी सूत्रसंचालन व पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून शुभारंभ कार्यक्रमाची समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी COVID-19 निदान प्रयोगशाळेचे आत्तापर्यंतचे कार्य व डीसीमार्फत रुग्णांना प्रदान करण्यात आलेल्या सेवांवर आकडेवारीसह प्रकाश टाकला. कार्यान्वित करण्यात आलेल्या 50 बेड क्षमतेच्या अतिदक्षता विभागाविषयी विस्तृत माहिती देताना रिवेरा रुग्णालयाचे डॉ. प्रशांत राजगुरू यांनी हाय फ्लो ऑक्सिजन व्यवस्थेसह कार्यरत 40 व्हेंटिलेटरची उपलब्धता, केंद्रीय ऑक्सिजन, आणि सेक्शन लाईन, पोर्टेबल एक्सरे मशीन व रुग्ण देखभालीकरता चोवीस तास कार्यरत कर्मचारी वर्ग यांच्या उपलब्धतेसह अतिदक्षता विभागाची सुसज्जता स्पष्ट केली.
जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या COVID-19 निदान प्रयोगशाळेतील स्वयंचलित RNA एक्सट्रॅक्शन मशिनमुळे COVID-19 नमुने तपासणीचा वेग वाढणार असून प्रयोगशाळेच्या क्षमता दुपटीने वाढ होणार आहे त्यामुळे COVID-19 बाधित रुग्णांची लवकर निदान करता येणे शक्य होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.