पाकिस्तानच्या समुद्रसीमेत भारताची पाणबुडी?
इस्लामाबाद ५ मार्च : दहशतवादी संघटनांविरूद्ध पाकिस्तानने कारवाई करायला सुरूवात केली आहे. ज्या संघटनांवर बंदी घालण्यात आली अशा संघटनांच्या ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल रऊफचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याने पाकिस्तानने आता काही दहशतवादी संघटनांविरूद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
दहशतावाद्यांना सागरी मार्गाने घुसून हल्ला कसा करायचा? याचं प्रशिक्षण दिले गेल्याचं नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी म्हटलं आहे. आपला शेजारील देश समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी म्हटलं आहे. शिवाय, दहशतवाद्यांना पाकिस्तान पैसा पुरवत आहे. त्यामुळे जगासमोर मोठं आव्हान उभं असल्याचं देखील नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी म्हटलं आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानविरोधात एअर स्ट्राईक करत भारतानं २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. शिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये देखील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. तसेच, दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य आता देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये देखील वळवला आहे. गुप्तचर विभागानं सूचना दिल्यानंतर प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशा वेळी नौदल प्रमुख सुनिल लांबा यांच्या विधानाला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे.
भारताच्या बालाकोटमधल्या हवाई हल्ल्याला आठवडा पूर्ण झालेला असतानाच पाकिस्तानने आणखी एक दावा केलाय. ४ मार्चला पाकिस्तानच्या सागरी हद्दीत भारतीय पाणबुडी दिसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्याबाबतचं वृत्त ‘डॉन’ने दिलं आहे.
Pakistan claims of downing Sukhoi jets and chasing away submarines rubbished
Read @ANI Story| https://t.co/An58lD3YlI pic.twitter.com/ZA2i59DuRz
— ANI Digital (@ani_digital) March 5, 2019
डॉन’ने हे वृत्त पाकिस्तानी नौदलाच्या हवाल्याने दिलं आहे. पाकिस्तानी नौदलाकडून एक व्हिडीओची प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात एका पाणबुडीचा वरचा भाग दिसतो आहे. या प्रकरणावर भारतीय नौदलानेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. या व्हिडीओचा तपास करत असल्याचं नौदलाने म्हटलं आहे.
या आधी नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी पत्रकार परिषद घेऊन दहशतवादी समुद्र मार्गाने हल्ल्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त केली होती.