अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोविड 19 साथरोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/ NEET या परीक्षा घेण्यात येऊ नयेत यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली शुक्रवार,दिनांक 28 ऑगस्ट रोजी आंदोलन केले.तसेच उपविभागीय अधिकारी,अंबाजोगाई यांचे मार्फत देशाचे पंतप्रधान यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्राप्त सुचनेनुसार कोविड 19 साथरोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत JEE/ NEET या परीक्षा घेण्यात येऊ नयेत यासाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने राजकिशोर मोदी यांचे नेतृत्वाखाली शुक्रवार,दिनांक 28 ऑगस्ट रोजी ” रद्द करा,रद्द करा…JEE/ NEET या परीक्षा रद्द करा” या आशयाचे फलक झळकावत आंदोलन केले.तसेच उपविभागीय अधिकारी,अंबाजोगाईयांचे मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक आसेफोद्दीन खतीब,नगरसेवक धम्मपाल सरवदे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा,रणजीत पवार,विशाल पोटभरे,दिनेश घोडके,सुनिल वाघाळकर,अशोक देवकर,अतुल कसबे,विजय कोंबडे,बबन पानकोळी,सचिन जाधव,जावेद गवळी,महेश वेदपाठक,शेख मुख्तार,कैलास कांबळे,शेख खलील,चंद्रकांत महामुनी,प्रताप देशमुख,सुधाकर टेकाळे,शेख इस्माईल,ज्ञानोबा वैद्य,प्रशिक सिरसट,अशोक बनसोडे,जाकेर नदाफ आदींची उपस्थिती होती.
कोरोना संसर्गामुळे JEE/NEET या परीक्षा सध्या घेवू नयेत
देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक JEE/NEET या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीसाठी आंदोलन करीत आहेत असे असतानाही भाजपाचे असंवेदनशील केंद्र सरकार या प्रश्नी ठोस भुमिका घेत नाही.सदर परीक्षा घेणे हे सध्याच्या काळात अत्यंत धोक्याचे व जोखमीचे आहे.अशा काळात परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना कोविड 19 चा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच परीक्षा घेण्यापुर्वी वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय आणि परीक्षांचे आयोजन हे निश्चितच अवघड होईल.अशा काळात परीक्षा होत असल्याने विद्यार्थी हे मानसिक तणावाखाली आहेत.बिहार,आसाम यासह विविध राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती पाहता विद्यार्थ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागु शकते.या विषयावर चर्चा होण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी देशातील विविध राज्यातील विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली,त्यात केंद्र सरकारच्या या निर्णयाला सामुहिक विरोध करायला हवा असा पुनरूच्चार अनेक मुख्यमंत्र्यांनी केला.या प्रश्नी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय ही घेतला.काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांची चिंता विचारात घेवून JEE /NEET या परीक्षा होऊ नयेत अशी जाहीर भुमिका घेतली आहे.महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना.बाळासाहेबजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.त्यामुळे JEE / NEET या परीक्षा सध्या रद्द करून पुढे घेण्यात याव्यात.
*-राजकिशोर मोदी,(अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)*