सातारा:आठवडा विशेष टीम― सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी दिपाली ताई कांबळे यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा.नितीन दोंदे सर यांनी केली आहे.
आपली निवड करून जी जबाबदारी दिली आहे त्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल, अशी आशा बाळगतो असेही या पत्रात नितीन दोंदे यांनी म्हटले आहे. तर यापुढील काळात या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे दिपाली ताई कांबळे यांनी सांगितले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.