आठवडा विशेष टीम―
खानापूर तालुक्याचा विटा येथे तर आटपाडी तालुक्याचा आटपाडी शहरात कोरोना स्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावळी ते बोतल होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, विटा उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसिलदार ऋषिकेश शेळके, तहसिलदार सचिन लंगुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता तात्काळ ऑक्सीजन बेड उपलब्धतेची सोय करावी. टप्प्याटप्प्याने आणखी बेडची संख्या वाढवावी. सर्वांना वेळेत उपचार मिळतील याची खबरदारी घ्यावी. रुग्णालयात आवश्यक औषध साठा उपलब्ध ठेवा. आवश्यक औषध खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. बाधित रूग्ण बाहेर फिरणार नाहीत त्याचबरोबर मार्केटमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी. शासन रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी व सोयी सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता याकामी दानशूर व्यक्तीनींही मदत करावी. नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, मनुष्यबळ, आवश्यक असणारे साहित्य याचा सविस्तर आढावा घेतला व संबंधितांना आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान पालकमंत्री जयंत पाटील यांनी खानापूर, आटपाडी तालुक्यासह कवठेमहांकाळ आणि जत या तालुक्याचाही कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेतला.
000000