ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वीज कामगारांची भूमिका अत्यंत मोलाची
परळी – महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) या संघटनेचे राज्यस्तरीय त्रेवार्षिक अधिवेशन बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत परळी वैजनाथ येथे संपन्न होत आहे याचा आनंद तर आहेच पण माझ्यासाठी समाधानाची बाब आहे, इंटकच्या त्रेवार्षिक अधिवेशनात आज परळी येथील गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदिर येथे पार पडले यावेळी उपस्थित कामगारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेउपाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय मुंडे बोलत होते.
धनंजय मुंडेंचा प्रतिनिधी म्हणून मी आज या अधिवेशनात उपस्थित राहून शुभेच्छा देत आहे असेही अजय मुंडे म्हणाले. वेळोवेळी वीज कामगारांच्या न्याय, मागण्यांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात आवाज उठवलेला आहे; यापुढेही ते आपल्या हक्कासाठी या संघर्षात त्यांचा सक्रिय सहभाग असेलच यात शंका नाही असा विश्वास यावेळी उपस्थित कामगारांना ना. मुंडेंच्या वतीने अजय मुंडे यांनी दिला.
या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा इंटकचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी दत्तात्रय गुट्टे हे नेहमी कामगारांच्या कल्याणासाठी धडपडत असतात, त्यांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी लढत असतात पण दत्तात्रय गुट्टेंचा आणि संघटनेचा हा लढा आता एकट्याचा नाही या लढ्यात आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही इंटक अधिवेशनाच्या निमित्ताने अजय मुंडे यांनी दिली.
यावेळी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंटकचे अध्यक्ष जयप्रकाशजी छाजेड साहेब, उद्घाटक इंटकचे कार्याध्यक्ष महेद्र घरत मुंबई, देवानंद सुरवसे (उस्मानाबाद), तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य महासचिव हिदुरावजी पाटील, सुरेश देवकर (बारामती), इंटकचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे, मुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण पी.एस.पाटील, योगेश जगदाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महापारेषण आनंत पाटील, हरिश्चंद्र रोटे, वीज इंटक कार्याध्यक्ष वामनराव जाधव, वीज इंटकचे सरचिटणीस गजानन अवचट (काका), चंद्रशेखर पुरंदरे, वीज इंटकचे उपाध्यक्ष सुनिल चौधरी, पि.एस.पाटील, एस.एन.चौघुले, संदिप वंजारी, एम.बी.जाधव, इंटकच्या सेक्रेटरी सौ.निलोफर मँडम, खजिनदार अहिरवाडी, इंटकचे उपाध्यक्ष आक्तर अलीखान , माधवी गायकवाड, दिलीपराव लोंढे, अनिल केसकर, शिवाजी घाडगे, कार्यकारी अभियंता अंबाजोगाई मंदार वग्यानी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता परळी नितीन थेटे आदी उपस्थित होते.परळी मार्केट कमिटीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, पंचाय समितीचे उपसभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे *स्वागताध्यक्ष तथा इंटकचे कार्याध्यक्ष दत्तात्रय गुट्टे, इंटक संघटनेचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.