परळी तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

परळी औष्णिक विद्युत केंद्र सतत सुरु ठेवण्यासाठी अभियंता कर्मचारी यांचे धरणे आंदोलन संपन्न ; MERC कडे जनहित याचिका दाखल करणार – ना.धनंजय मुंडे

मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन तीव्र करून परळी बंदचीही हाक देणार – कृती समिती

परळी (प्रतिनिधी): दि.८ मार्च रोजी परळी थर्मल पॉवर स्टेशन येथील मुख्य अभियंता प्रशासकीय इमारतीसमोर सर्व अभियंता कर्मचारी यांच्या १० संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने औष्णिक विद्युत केंद्र सतत सुरु ठेवण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या या स्वस्त दराचा कोळसा, कोळसा वाहतूक ५०० किमी मध्ये सूट जेणे करून सर्व संच एम. ओ. डी. मध्ये येतील. कायमस्वरूपी पाईपलाईन माजलगाव ते परळी, नाशिकच्या धर्तीवर MUST RUN करण्यात यावे. या आंदोलनास विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, काँट्रॅक्टर अँड सप्लायर्स असोसिएशन, परिसरातील सरपंच, व्यापारी संघ, न.पा., आदींनी भेट देऊन लेखी समर्थन दिले. यावेळी आंदोलन कर्त्यास विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी भेट दिली व यासंदर्भात महाराष्ट्रा इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन कंट्रोल मुंबई.

जनहित याचिका दाखल करून हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे आश्वासन दिले. शहरातील औष्णीक विद्युत केंद्राचे संच एकामागून एक बंद पडत असून सर्वच संच बंद झाल्यास मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. मराठवाड्यात केवळ परळी येथेच औष्णीक विद्युत केंद्र असून मराठवाड्यास संजिवनी देणार्‍या प्रकल्पावर बंदची टांगती तलवार दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर औष्णीक विद्युत केंद्र (थर्मल) बचावसाठी क्रमबद्ध आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनामध्ये एम. एस.ई. वर्कर्स फेडरेशन चे सुधीर मुंडे, संदीप काळे, वीज कामगार महासंघ चे वैजनाथ कराड, आर. व्ही. कवळेकर, सबॉर्डिनटे इंजि. असोसिएशन चे अरुण गित्ते, विशाल गिरी, विद्युत क्षेत्र ता.का. युनियन चे हरिराम गित्ते, चेतन रणदिवे, मा. रा. वीज तां.का. संघटना डी. एन. देवकते, मझर पठाण, ग्रॅजुएट इंजि. असोसिएशन चे नितीन ठोंबरे, मोमीन, वीज निर्मिती कामगार संघटना चे डी. एस. फड, साहेबराव चव्हाण, असोसिएशन ऑफ केमिस्ट चे वाय. बी. नागरगोजे, यशवंत पवार, मागासवर्गीय विद्युत क.संघटनाचे बाप्पा वडमारे, राहुल बनसोडे, पावर फ्रंट चे डी. के. माने, सुनील जाकेटिया, इंटक चे दत्तात्रेय गुट्टे, बन्सी अण्णा सिरसाट, थर्मल पावर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर्स अ‍ॅण्ड सप्लायर्स चे अध्यक्ष अंगद हडबे, शिवाजी बिडगर, शेखर स्वामी, बुरकुले रमेश सरवदे, बाबासाहेब गायकवाड, संजय व्हावळे, काँग्रेस पक्षाचे प्रा. विजय मुंडे, भाजपा चे प्रा. पवन मुंडे, दत्ता कुलकर्णी, दत्ता पाइतके, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, दत्तात्रेय ढवळे, रा.काँग्रेस चे भैय्या धर्माधिकारी, कृषी बाजार समितीचे माणिक फड, महाराष्ट्र पोलीस पाटील संघाचे पांडुरंग रोडे, शिवसंग्राम चे तुळशीराम पवार, संभाजी ब्रिगेड चे संभाजी आमले, डॉ. यशवंत देशमुख, माजी सभापती, सूर्यभान नाना मुंडे, दत्ता सावंत, नीलकंठ चाटे, संगमच्या सरपंच वात्सल्याबाई कोकाटे, दाऊतपूरचे सरपंच श्रीकांत फड, मराठा सेवासंघाचे प्रदीप थेटे, डॉ.संतोष मुंडे, परळी पत्रकार संघाचे बाळासाहेब कडबाणे, धीरज जंगले, धनंजय आढाव, संभाजी मुंडे, महादेव गित्ते, मोहन व्हावळे, भगवान साकसमुद्रे, बोधेगाव चे सरपंच ज्ञानोबा गडदे, सतीश जगताप, अंकुश जाधव आदींनी पाठींबा दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button