आठवडा विशेष टीम―
अभिजीत राणे युथ फौडेंशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वृत्तपत्र लेखन स्पर्धेत जेष्ठ वृत्तपत्र लेखक विश्वनाथ केशव पंडित यांच्या “ रक्त दानासाठी मानसिकता वाढवायला हवी, व्यवहार नको ” या पत्रास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांना वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण २०२० या पुरस्काराने लवकरच गौरविण्यात येणार असल्याचे युथ फौडेंशनचे संस्थापक, अध्यक्ष अभिजीत राणे यांनी जाहिर केले.
विश्वनाथ पंडित हे चाळीस वर्षाहून अधिकतम काळ अविरतपणे विविध विषयावर पत्रलेखनाद्वारे सामाजिक, नागरिक व्यथा, वेदना, समस्या मांडीत असतात. अनेक सामाजिक संस्थाच्या द्वारे त्यांचा सामाजिक कार्यातही सहभाग राहिलेला आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक विश्वनाथ पंडित, द्वितीय दत्ता खंदारे, तृतीय प्रिया मेश्राम विजयी ठरले असून ४ सिराज शेख, ५ सुधीर कनगुटकर, ६ दत्तप्रसाद शिरोडकर, ७ सुभाष अभंग, ८यशवंत चव्हाण, ९ गणेश लेंगरे, १०किरण धुमाळ, तर उत्तेजनार्थ जनार्दंन नाईक, शांताराम वाघ, रोहित रोगे, संगीता जांभळे, अनुज केसरकर आदि राज्यातील विविध जिल्हयातील, तालुक्यातील पत्रलेखक विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे महेश्वर तेटाबे, निसार अली, शांताराम गुडेकर, सुरेश पोटे, कैलाश रांगणेकर, आकाश पोकळे, पंकजकुमार पाटील, लक्ष्मण राजे, रफिक घाची, गणेश हिरवे, उदय सांगळे, नीलेश धुरी, श्याम ठाणेदार, वैभव पाटील, गुरूंनाथ तिरपनकर, शशिकांत सावंत यांना पत्रकारितेच्या योगदानाबद्यल विशेश पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याचे स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे यांनी कळविले आहे.