काँग्रेसच्या ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ या ऑनलाईन मोहिमेस उदंड प्रतिसाद
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ ही ऑनलाईन मोहिम शनिवार,दि.26 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी राबविण्यात आली.या मोहिमेतर्गंत बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी झाले.या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला.या मोहिमेतर्गंत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारने जी तीन विधेयके आणली.ती मागे घ्यावीत अशी मागणी करणारे व्हिडीओ,फोटो,संदेश हे सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक,ट्विटर, इन्टाग्राम,युट्युब यावर पोस्ट करून भाजपा प्रणित केंद्र सरकारचा जाहिर निषेध केला.या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होवून शेतक-यांच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला.‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ ही ऑनलाईन या मोहिमेत बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्माननिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष आदींसह 500 हून अधिक जण उत्स्फुर्त पणे सहभागी झाले.बीड जिल्ह्यात ही मोहिम सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचली. अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या बाबत बोलताना नमुद केले आहे की,वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयका विरूद्ध 24 सप्टेंबर पासुन देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याचाच एक भाग म्हणून शनिवार,दि.26 सप्टेंबर रोजी ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ ही ऑनलाईन मोहिम राबविण्यात आली.भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधयके संसदेत मंजूर करून घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.या विधेयकांच्या विरोधात लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यांवर येऊन याला तीव्र विरोध करत असताना हे निर्दयी सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे.या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संसदेसह कोणाशीही चर्चा वा संवाद न साधताच गरिब शेतक-यांवर हा कायदा लादत आहे हे अन्यायकारक आहे.या पार्श्वभूमीवरच काँग्रेस अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,प्रभारी यांच्या समवेत एक विशेष बैठक नुकतीच 21 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत शेतकरी विरोधी विधयके व त्या विरोधात संघर्ष करणार्या शेतक-यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 24 सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला.या आंदोलनाचे स्वरुप म्हणजे ऑनलाईन मोहीम होय.भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शनिवार,दि.26 सप्टेंबर रोजी सर्व पदाधिकारी यांनी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदवला.
केंद्राचे कायदे शेतकरी विरोधी आणि उद्योगपती यांच्या हिताचे-राजकिशोर मोदी
==================
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने ‘स्पीक अप फॉर फार्मर्स’ ही ऑनलाईन मोहिम राबविण्यात आली.या मोहिमेत बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्यासह पाचशे हून अधिक जण सहभागी झाले.भाजपाने निवडणूकीच्या जाहिरनाम्यात दिलेले उत्पादन खर्चाच्या दिडपट हमिभावाचे आश्वासन याला पुर्णपणे हरताळ फासत कुठलही चर्चा न करता केवळ बहुमताच्या जोरावर तीन शेतकरी विरोधी काळे कायदे व विधेयक मंजुर केले आहेत.अंबानी,अदानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना फायदा होण्यासाठी व स्वतःचे हित साधण्यासाठी शेतकरी व शेतमजुरांचे स्वातंत्र्य हिरावणारे हे कायदे आहेत.त्याचा काँग्रेस पक्ष जाहिर निषेध करीत आहे.या कायद्यांवर सर्वपक्षीय चर्चा अपेक्षीत होती.परंतु,ती झाली नाही. हे दुर्दैवी आहे.महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,माजी प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदरील केंद्राने केलेले कायदे महाराष्ट्र सरकार राबविणार नाही.ही काँग्रेसची भूमिका आहे.शेती, शेतकरी व शेतमजुर विरोधी विधेयकांचा जाहिर निषेध करीत आहोत असे प्रतिपादन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.