गेवराई दि.०९ : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आयोजित 1871.34 कोटी खर्च करून बीड जिल्ह्यातील येडशी ते औरंगाबाद 211 किमी लांबीच्या चौपदरीकरण करणे या रस्त्याचे लोकार्पण आज गेवराई, जिल्हा बीड येथे ना.पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते पार पडले तसेच याच कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव देवगाव लासुर स्टेशन रा.मा. 39 या रस्त्याची सुधारणा करणे 57 कोटी चे व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण ते शहागड या रस्त्याची सुधारणा करणे 20 कोटी रुपये या दोन्ही रस्त्याचे भूमिपूजन आज ना.नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पार पडले.
सदर समारंभास खा.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे, आमदार सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मण पवार, सुरेश धस, भीमराव धोंडे, आर.टी. देशमुख, संगीता ठोंबरे , जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह विविध पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.