परळी:अशोक देवकते― मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुण युवक पाण्यात बुडल्याची घटना आज रविवार ४ अॉक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास परळी जवळील चांदापूरच्या तलावात घडली. युवकाचा शोध घेण्यासाठी तलाव परिसरात मुलांच्या नातेवाईकासह गावातील अनेक नागरिकांनी धाव घेतली होती.आतापर्यंत मात्र मुलाचा शोध लागलेला नव्हता.परळी शहरातील हादीपुरा येथील खाजा मीर सहाब शेख वय २० वर्षे हा तरूण चांदापूरच्या तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता सदरील तरुणासोबत अन्य तिघे जण पोहण्यासाठी गेले होते मात्र ते बाहेर आले पण खाजा मीर सहाब शेख हा बाहेर आलाच नाही सदर तरूणाचा शोध सुरू आहे.
0