सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― स्मशानभूमीत वीज आणि पाण्याची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी रविवारी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी स्मशानभूमीत उपोषण सुरु केले आह. सोयगाव तालुक्यातील स्मशान भूमीत वीज आणि पाण्याची मुलभूत सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे विजेअभावी अंधारातच अंत्यसंस्कार आटोपते घ्यावे लागतात व पाण्याची मुबलक सुविधा नसाल;याने मोठी कोंडी झाली असून तालुक्यातील स्मशानभूमीत तातडीने वीजपुरवठा आणि पाण्याच्या सुविधेच्या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी उपोषण हाती घेतले आहे.
0