लोहारा(प्रतिनिधी): शेंदूर्णी येथील राणी लक्ष्मीबाई महिला पतसंस्था विस्तारित भवन येथे नुकताच फफुटा या चित्रपटाचा मुहूर्त कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी सिनेमाच्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले..! ह्या वेळी चित्रपटाचे लेखक व गीतकार,, हरी महाजन चित्रपटाचे नायक व नायिका गणेश खाडे, अपूर्वा शेलगावकर सोबत सिनेमाचे खलनायक मयूर भाटकर व कॉश्यूम डिझायनर ज्योती भाटकर आर्ट डिरेक्टर जगदीश शेलार हे ही उपस्थित होते, या चित्रपटाचे दिग्दर्शक प्राध्यापक भूषण काटे, आणी प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक रुपेशजी माने हे करत असून..निर्मिती व्यवस्था हेमंत आजलसोंडे, भूषण काटे ,आणी हरी महाजन हे करत आहेत,या सिनेमाला संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध संगीतकार अमरजी प्रभाकर देसाई (मुंबई) यांचे संगीत लाभले असून, सिने सृष्टीतील जग प्रसिद्ध पार्श्वगायक श्री गणेश जी पाटील “पी गणेश” यांचा सुंदर आवाज लाभलेला आहे. कार्यक्रमाच्या वेळी सिंगर, पी गणेशजी , ज्यू.शाहरुख खान, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, शेंदूर्णी शहरातील उत्तम दादा थोरात यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीकृष्ण चौधरी सर यांनी केले, तसेच परिसरातील ह.भ.प. कडूबा म. माळी, वामन फासे, डॉ विजयानंद कुलकर्णी, डॉ. अशोक बैरागी, भगवान बैरागी, पंडित राव जोहरे, लोहारा येथील पत्रकार दिनेश चौधरी, शेंदूर्णी येथील न्यूज 99 चे वार्ताहर कापुरे साहेब, प्रकाशजी झंवर, सुधाकर गुजर, आदर्श शेतकरी सुरेशभाऊ पाटील, सुधाकर चौधरी, विलास पाटील, बाळू धुमाळ, ज्ञानेश्वर ढमाले, मधुकर पडोळ, शिवाजी धुमाळ, दीपक पाटील, शरीप तडवी, तसेच गावातील आदी मान्यवरांच्या उपस्थित, फफुटा या शेतकरी जीवनातील प्रेम कथेवर आधारित सिनेमाची मुहूर्त मेळ साधल्या गेली..! ही कथा एका लढवय्या शेतकऱ्याची आसून,त्याच्या जीवनात येणाऱ्या कित्येक समस्यां तो अगदी प्रमाणिक पणे सोडवतो, गावासाठी काही चांगले करण्याचे त्याचे ध्येय असते पण गावातील काही विकृत लोकं त्याला जगू देत नाही आणी मग विरोधाभास कथेत घडतो आणी शेवटी सगळे सकारात्मक घडते.
0