परळी:आठवडा विशेष टीम― सणासुदीच्या काळात प्रवाश्यांची गरज लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नांदेड ते पनवेल व्हाया लातूर विशेष रेल्वे आजपासून सूरु केली आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर व लातुर रोड स्थानकावर ही गाडी थांबणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी एक माहिती पत्रक काढून नांदेड ते पनवेल विशेष रेल्वे शुक्रवारी (आजपासून) सुरू करणार असल्याचे कळविले. गाडी क्र 07614/13 नुसार चालणारी ही गाडी लातूर रोड येथे रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी तर लातूर येथे 10 वाजून 55 मिनिटांनी पोहचणार आहे. पुढील प्रवासात उस्मानाबाद, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, चिंचवड, तळेगाव व लोणावळा करत शनिवारी सकाळी 9 वाजता पनवेल येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात 24 तारखेला शनिवारी ही गाडी पनवेल येथून सायंकाळी 4 वाजता सुटणार असून लातूर येथे रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी तर लातूर रोड येथे 3 वाजून 20 मिनिटांनी पोहचेल. नांदेड पनवेल 23 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर तर पनवेल ते नांदेड 24 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी दररोज धावणार आहे. या गाडीला नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, दौड, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा व पनवेल स्थानकावर थांबेल अशी माहिती दक्षिन मध्य रेल्वे ने काढलेल्या पत्रकात दिली असल्याचे परळी भा ज पा चे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी सांगितले. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेचे पत्रकार जी एस सौंदळे यांनी संघटनेच्या वतीने खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
0