मुंबई: सीएसएमटी येथील कोसळलेल्या पादचारी पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं त्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे, म्हणूनच याला रेल्वे जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
“लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलांचे ऑडिट झालेलं होतं मात्र, या पुलाचे ऑडिट झालेले नव्हते. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तरीही यावर अद्याप काहीही कर्यवाही करण्यात आलेली नाही.” असे सानप म्हणाल्या.
दरम्यान,सीएसएमटी स्थानकातील टाइम्स ऑफ इंडिया जवळील ब्रिज कोसळला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.३६ जण जखमी झाली आहेत.तसेच जखमींवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहे.एनडीआरएफ व अग्निमशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.