भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ-डॉ.ए.बी.देशपांडे

Last Updated by संपादक

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे असे प्रतिपादन डॉ.ए.बी.देशपांडे यांनी केले.ते येथील कै.बेथूजी गुरूजी प्रतिष्ठाण मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन कार्यक्रमात बोलत होते.कोविड-19 अंतर्गत सदर कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ.ए.बी.देशपांडे हे उपस्थित होते.सर्वप्रथम त्यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच 26/11 मधील शहीदांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी प्रतिष्ठाणचे प्रवर्तक सुरेंद्रनाना खेडगीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.राम चौधरी म्हणाले की,भारतीय संविधाना संदर्भात जन-जागृती व माहिती व्हावी तसेच देशाचे ऐक्य,एकात्मता कायम टिकून रहावी,नागरिकांना मुलभूत हकाची,अधिकाराची व कर्तव्याची जाणीव आणि माहिती व्हावी या एकमेव उद्देशापोटी संविधान दिनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे ख-या अर्थाने संविधान दिन साजरा करणे होय.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन प्रा.राम चौधरी (धर्मापुरीकर) यांनी केले.तर उपस्थितांचे आभार श्रीधर काळेगावकर यांनी मानले.या प्रसंगी नायब तहसीलदार महेश राडीकर हे हजर होते.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.