बीड प्रतिनिधी: निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दहा पदव्युत्तर जागा मेडीकल कौन्सिल ने रद्द केल्याबाबतचे निवेदन मेडीकल काॅलेज प्रशासनाकडुन पालकमंत्र्यांच्या माध्यमातुन डॉ प्रितमताई मुंडे यांना प्राप्त झाले होते.
सदरील प्रश्नी तोडगा निघने या रुग्णालयातील सहा विभागांतील रुग्णसेवेचा कणा असलेल्या दहा निवासी डाॅक्टरांच्या जागांचा असल्याने तातडीने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन हा विषय मार्गी लावण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रही मागणी प्रितम मुंडे यांनी केली होती.
या पाठपुराव्याला यश आले असुन स्वा.रा.ति. च्या दहा डिप्लोमा पदव्युत्तर कोर्स च्या जागा वाचल्या आहेत.
यापुर्वीही मुंडे यांनी लक्ष घालुन येथील एमबीबीएस च्या वाढीव पन्नास जागा, बंद पडलेला सोनोग्राफी विभाग सुरु करणे, तसेच रेडीआॅलाॅजी आणि अस्थिरोग विभागांमध्ये प्रथमच दहा नविन पदव्युत्तर पदविकांच्या कोर्सची सुरुवात करुन रुग्णसेवेचा व या वैद्यकीय महाविद्यालयाचाही दर्जा ऊंचवन्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेले आहेत.