ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह सर्व आमदार, महायुतीचे नेते राहणार उपस्थित
बीड दि. २२ : बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा -शिवसेना -रिपाइं व रासप महायुतीच्या उमेदवार तथा जिल्हयाच्या दबंग खासदार डॉ. प्रितमताई मुंडे हया येत्या २५ तारखेला अलोट जनसागराच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे तसेच जिल्हयातील भाजपचे सर्व आमदार, महायुतीचे नेते यांच्यासह लाखो कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी दुपारी २ वाजता पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात जावून खा. प्रीतमताई मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यानंतर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य रॅलीला सुरवात होणार आहे. ही रॅली प्रमुख मार्गावरून निघून छत्रपती शिवाजी महाराज यांच्य पुतळ्याजवळ येणार आहे, याठिकाणी पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप दुपारी ४ वा. विश्रामगृहाच्या पाठिमागे असणा-या माने काॅम्प्लेक्सच्या मैदानात प्रचंड जाहीर सभेने होणार आहे. यावेळी आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, बदामराव पंडित, साहेबराव दरेकर, केशवराव आंधळे, आदिनाथ नवले, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, बहूजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरे,भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, रमेश आडसकर, रासपचे बालासाहेब दोडतले, राजेंद्र मस्के आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा महायुती प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
डाॅ. प्रीतमताई विक्रमी मतांनी विजयी होणार
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत डाॅ. प्रीतमताई मुंडे हया देशात रेकॉर्डब्रेक मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या .यावेळीही जिल्ह्यात केलेल्या विकासकामांच्या बळावर त्या दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील असा ठाम विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रितमताई मुंडे यांनी आपल्या पाच वर्षाच्या खासदार पदाच्या कार्यकाळात जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा असलेल्या परळी – बीड – अहमदनगर हा स्वप्नवत वाटणारा रेल्वेमार्ग सत्यात उतरतो आहे
या रेल्वे मार्गासाठी सर्वाधिक निधी त्यांनी आपल्या कार्यकाळात आणला आहे .तसेच या मार्गाची नगर ते सोलापूरवाडी पर्यंतची चाचणी पूर्ण झाली. बीडच्या जवळ या मार्गावर रूळ अंथरण्याचे काम वेगात सुरू असून लवकरच या मार्गाचे काम पूर्णत्वास जात आहे . तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याने जिल्हयात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे .या महामार्गाचीही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. गेल्या पाच वर्षाच्या काळात जिल्हयाला विकासाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम प्रितमताईंनी केले आहे.