परळी तालुका

परळी-अभिनव विद्यालय येथे शहीद दिनानिमित्त क्रांतिकारांना अभिवादन

परळी (प्रतिनिधी): ज्ञानप्रबोधनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय येथे शहीद दिन संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील सहशिक्षक निलेश व्हावळे होते या कार्यक्रमाचे सुरुवात भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली सरदार भगतसिंग चा जन्म पंजाबातील बंग या गावी सन 1960 साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला तसेच शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे एका मध्यवर्ती कुटुंबात झाला सुखदेव यांचे संपूर्ण नाव सुखदेव राम लाल थापर त्यांचा जन्म 15 मे 1960 रोजी झाला साक्षात मृत्यू समोर असताना क्रांतीचा जयजयकार करणारे भारतमातेचे थोर सुपुत्र भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव होते सण 1928 आली लोहार येथे सात मन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिशअधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपतराय जबर जखमी झाले व नंतर 17 नोव्हेंबर 1948 रोजी मरण पावले सारा देश हळहळला या कृत्याचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी भगतसिंग चंद्रशेखर आजाद राजगुरू व जय गोपाल व त्यात सोपवण्यात आली 23 मार्च 1931 रोजी तिन्ही क्रांतिकारक देशासाठी फासावर चढले असे प्रतिपादन निलेश व्हावळे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेभाउ नागरगोजे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन रुपेश पोतले यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button