कोरोना संसर्ग लाटेत नागरिकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची – सुरेश पाटोळे

आरोग्य विभागाने जास्तीत जास्त ग्रामीण भागात ‘कोरोना केअर सेंटर’ चालू करावेत

पाटोदा/नानासाहेब डिडुळ(उपसंपादक)―

भारतामध्ये जनता ही या देशाची मालक असतांना त्यांना आरोग्य सारख्या जीवनावश्यक सुविधा मिलत नसतील तर त्यास सर्वस्वी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत मग तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य असला तरी नागरिकांना सहज व मोफत आरोग्य सुविधा देणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. असे मत मानवी हक्क अभियान चे जिल्हा सरचिटणीस तथा शिव संघर्ष ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी समाजमाध्यमातून व्यक्त केले आहे.

आम्ही सर्व भारतीयांनी लोकप्रतिनिधीला मतदान करून निवडणून दिलेले आहे. जेणेकरून आम्हाला जीवनावश्यक सुविधेसह आरोग्य सुविधा मिळतील. परंतु आजच्या वाढलेल्या कोरोना संसर्ग लाटेच्या परस्थितीवरून असे लक्ष्यात येते की, अनेक सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचे प्राण जात आहेत. त्यांचे प्राण वाचवणे हे आरोग्य विभागाची जेवढी जबाबदारी आहे, त्यापेक्षा जास्त जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे.
देशातील, राज्यातील व ग्रामीण भागातील गरीब माय-बाप जनतेने मतदान करून योग्य लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. जेणेकरून आपण जनतेची सेवा कराल परंतु आपण गोरगरीब जनतेला भिकाऱ्यासारखे आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी रांगा लावण्याची पाळी आणली आहे. काही कोरोना सेंटरवर तर रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन, आक्सिजन, व्हेंटिलेटर इत्यादी आरोग्य सुविधा न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रत्येक गावात आरोग्य विभागाने ‘कोरोना केअर सेंटर ‘ उभारून आरोग्य सुविधा देण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक नागरी वस्त्यात गोरगरीब जनतेचे हातावर पोट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना साधे रेशनचे धान्यसुद्धा मिळत नाही. तरी लोकप्रतिनिधी ने आरोग्य सुविधेसह अन्नधान्य मिळवून देण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी केली आहे.