कृषी अधिकारी श्री सूर्यकांत शेकडे साहेब यांचा सेवानिवृत्त सोहळा आयोजन

कडा(शेख सिराज)- कृषी अधिकारी श्री सूर्यकांत महादेव शेकडे साहेब यांचा सेवानिवृत्त सोहळा आयोजन .करण्यात आला यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
30/7 /2021 रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहे. त्यांनी शासकीय सेवेत 30 जुलै 1984 साली तालुका कृषी अधिकारी पाटोदा येथे कृषी पर्यवेक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर आष्टी, बीड ,माजलगाव, वैजापूर शिरूर कासार, येथे कृषीप्रवेशक व कृषी अधिकारी म्हणून काम केले .प्रमोशन मिळाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी बीड अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी म्हणून सन 2008 ते 2013 पर्यंत जबाबदारी सांभाळली. सण 2013 पासून तालुका कृषी अधिकारी आष्टी येथे 2018 पर्यंत काम केले. उर्वरित सेवाही तालुका कृषी अधिकारी अहमदनगर अंतर्गत मंडळ कृषी अधिकारी म्हणून काम केले. बीड जिल्हा कृषी खाते अंतर्गत पतसंस्थेचे अध्यक्ष सन 2001 ते 2007 पर्यंत होते या कालावधीत व संस्थेची भव इमारतीची उभारणी करण्यात आली व सभासदांचे हीत जोपासली संचालक म्हणून 2000 सात ते 2017 पर्यंत संचालक म्हणून काम केले तसेच कृषी खात्याच्या विविध संघटनेत विविध पदावर राहून विभागीय व राज्यस्तरीय संघटनेत कामे केली .तसेच महाराष्ट्र राज्य वंजारी कर्मचारी सेवा संघाची स्थापना करून संघटन कार्यरत ठेवले. सामाजिक व कर्मचारी अधिकाऱ्यांचे बीड येथे मोठ्या संख्येने मा.गोपीनाथ मुंडे साहेब ,मा. बनराव ढाकणे साहेब ,मा तुकाराम दिघोळे साहेब ,मा. गोविंदराव केंद्रकर साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन घेतले कृषी विभागाचे काम करत असताना कृषी विभागाचे विविध योजना शेतकरी मेळावे बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून हाती घेऊन राबवले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. श्री शिवाजीराव जगताप साहेब कृषी उपसंचालक मा. विलासराव ढाकणे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी मा. श्री कापसे साहेब तंत्र अधिकारी मा.दमाने साहेब तालुका कृषी अधिकारी मा. श्री पोपटराव नवले साहेब यांच्या हस्ते परिवार चा सत्कार करण्यात आला या यावेळी कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

Previous post कोरोना संकटाच्या कालावधीत पोलिसांचे योगदान मोलाचे
Next post सुलेमान देवळा येथे स्वच्छता अभियान नागरिकांचा सहभाग