सुलेमान देवळा येथे स्वच्छता अभियान नागरिकांचा सहभाग

Last Updated by संपादक

कडा /प्रतिनिधी शिराज शेख-
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा गावातील नागरिकांनी आपला परिसर आपली स्वच्छता या नाविन्यपूर्ण उपक्रमास नागरिकांचा उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला परिसरातील स्वच्छता करण्याचा निर्णय सर्व नागरिकांनी घेतला व स्वच्छता मोहिमेला सुरूवात करण्यात आली. प्रथम हनुमान मंदिर व ज्ञानमंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आले.व नंतर सुलेमान देवळा गावातील मज्जिद परिसरातातुन तननाशक फवारणील्या सुरुवात करण्यात आली.कब्रस्तानची भिंत ते मारूती मंदिर परिसर व नंतर जिल्हा परिषद शाळा चे पुर्ण मैदान व पशुवैदयकिय दवाखाना परिसरात फवारणी करून स्मशानभूमीपर्यंत फवारणी करून घेण्यात आली.. करोना काळात धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळे गावाच्या वेशी बाहेरील देवांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यानंतर रोकडोबा, मुंजोबा यांना आंधोळ घाळून शेंदुर माळ व नारळ फोडण्यात आला. यावेळी श्री. महादेव ओव्हाळ , आबासाहेब भादवे, नंदराज अशोक घोडके , रवींद्र शिंदे वसंत भोजे, यांनी स्वच्छताचे काम हाती घेऊन चांगल्या प्रकारे कामगिरी केली. कोणाला मज्जिद मध्ये आल्ला तर कोणाला मंदिरात राम दिसतो. तर कोणास ज्ञानमंदिरात भविष्य दिसतो .पण आम्हांला विचु, काटा,मच्छरपासुन स्वच्छता करून आनंद मिळतो.याचप्रमाणे सर्वांनी आपल्या भागात आपली स्वच्छता हि मोहिम राबवल्यास आपला परिसर स्वच्छ राहील असे सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी सांगितले