घोसला,ता.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी घोसला ग्राम पंचायत आणि विघ्नहर्ता मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटलच्या वतीने सोमवारी भव्य आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ३१० रुग्णांची विविध तपासण्या करण्यात आल्याची माहिती डॉ.भूषण मगर यांनी दिली.
घोसला ता.सोयगाव येथील सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर काटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ.भूषण मगर,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,विक्रम पाटील,सरपंच सुवर्णाबाई वाघ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या शिबिरात तब्बल ३१० जणांची विविध रोगांची तपासणी करण्यात आली होती,यामध्ये प्रामुख्याने मधुमेह,हृदयरोग,बी.पी,आदींची तपासणी करण्यात येवून घोसला गाव कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित करण्यासाठी या शिबिराचा उद्देश असल्याची डॉ.भूषण मगर यांनी सांगितले.तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी ४० जणांना मोफत उपचारासाठी पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल मध्ये संदर्भसेवेसाठी बोलाविण्यात आले असून दहा जणांना शास्र्क्रीयेसाठी बोलाविण्यात आले आहे.यावेळी उपसरपंच सुभाष बावस्कर,सदस्य पवित्राबाई युवरे,अलकाबाई बावस्कर,प्रतिभा गवळी,प्रतिभा पाटील,गणेश माळी,सतीश सोनवणे,सोमू तडवी,आदींनी पुढाकार घेतला होता.
विशेष सहकार्य -मराठा प्रतिष्ठानचा रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध-
मराठा प्रतिष्ठानचं रुग्णवाहिकांच्या मदतीने गावातून रुग्णांना शिबीर स्थळी आणण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या आदेशावरून मदतकार्य करण्यात आले होते त्यामुळे ग्रामस्थाच्या सहकार्याने शिबीर यशस्वी झाले आहे.