बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

रानडुक्करासाठी कुंपण केलेल्या तारेने दोघांचा मृत्यू

बीड:नानासाहेब डिडुळ― शेतात रान डुक्कर नुकसान करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडला. दरम्यान या शेतकऱ्याचा शेजारी रात्रीच्या वेळी ज्वारी ला पाणी देण्यासाठी गेला असता वीज प्रवाह सोडलेल्या कुंपणाला हात लागून शॉक बसला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ मदतीला धावला मात्र यावेळी दोघांचाही करंट लागून मृत्यू झाला ही घटना नाळवंडी येथे घडली.
हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख असे मृत्यू झालेल्या शेतकरी भावांची नावे आहेत पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना रान डुकरांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा प्रशासन दरबारी शेतकऱ्यांनी सांगूनही प्रशासन व्यवस्था याकडे दुर्लक्ष करते म्हणून या भागातील शेतकरी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. नाळवंडी येथील रवी ढोले यांनी आपल्या शेतातील पिकांचा रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी तारेचे कुंपण करुन त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. रात्री त्यांच्या शेजारचे शेतकरी हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख हे रात्रीची वीज असल्याने गुरुवारी रात्री शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते.यावेळी हुसेन फकीरभाई शेख यांचा कुंपणाच्या विद्यूत प्रवाह सोडलेल्या त्या तारेला हात लागला. त्याचवेळी त्यांचे बंधू जाफर फकीरभाई शेख हे त्यांना सोडवण्यासाठी त्याठिकाणी गेले, मात्र त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या वीजेमुळेच दोन सख्या शेतकरी बांधवांचा जीव गेल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Back to top button