पाटोदा (शेख महेशर) दि.२४ : सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मानवी हक्क अभियान चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्ली जे एन यु चे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड यांनी श्री.सुरेश पाटोळे यांची मानवी हक्क अभियानच्या बीड जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
आयुष्यात प्रत्येक पावलावर गोरगरिबांची दीनदलितांची अनाथ अपंग व वंचित घटकांच्या वेदनांची जाणीव ठेवून तळमळणारा नव्हे तर प्रत्येक दुःखावर फुंकर घालणारा करता सुधारक म्हणून सुरेश पाटोळे हे नाव आता कौतुकाचा आणि चर्चेचा विषय आहे
मुळात पाटोदा तालुक्यातील आठ्ठेगाव पुठ्ठा परिसरातील वाहली या छोट्या गावात जन्मलेल्या श्री. सुरेश पाटोळे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत शिक्षणाचे धडे गिरवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले , शाहीर आण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून आपली वाटचाल करणारा हा युवक बीड जिल्ह्यात स्नेह आणि आपुलकीचा केंद्रबिंदू झाला आहे.
वहाली ग्रामपंचायत पदाधिकारी ते बीड शहरातील विविध घटकांमध्ये मिसळून गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरेश पाटोळे पुढे असतात ऊसतोड कामगारांच्या समस्या असो आजारपण असो गोरगरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न असो ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात.
वहाली , कुसळंब , चिंचोली चिखली , निवडुंगा, सावरगाव, मुगाव आष्टी, पाटोदा, बीड आदी परिसरातील शिक्षण , समाज , कृषी आरोग्य आदी क्षेत्रात विविध अधिकारी व पदाधिकारी यांच्या संपर्कात राहून दीनदलित, दुबळ्या अनाथ बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात हे आता सिद्ध झाले आहे ते बोलके नव्हे तर करते कार्यकर्ते म्हणून पुढे आल्याचा आठ्ठेगावपुठ्यासह जिल्ह्यात आनंद वाटू लागला आहे.
आठ्ठेगाव पुठ्यातील अनेक अपंग, निराधार, अडाणी, शेतकरी ,गरीब विद्यार्थी यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते दवाखान्याचा प्रश्न असो. विद्यार्थ्यांचा प्रश्न असो. बँकेतील अडचण असो की निराधारांचा असो सुरेश पाटोळे हे नाव खांबा सारखे सदैव असते कार्यकर्त्यांना अभिमान वाटतोय.
संत वामन भाऊ महराज, संत भगवानबाबा , श्री खंडेश्वर आदीसह विविध देवता विषयी त्यांना आदराची भावना असल्याने भाविकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी हा हरहुन्नरी अष्टपैलू कार्यकर्ता पुढेच असतो.
पायात भिंगरी बांधल्यागत गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यात धन्यता मानणारा आणि आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी मनाने श्रीमंत असलेला हा कार्यकर्ता सर्व जाती-धर्म बांधवासाठी भूषण ठरत आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरेश पाटोळे यांचे नुकतेच मानवी हक्क अभियान या सामाजिक संघटनेच्या बीड जिल्हा सचिव पदी निवड झाल्याने अनेक राजकीय नेते , सामाजिक कार्यकर्ते , विविध क्षेत्रातील नागरीक, तरुण कार्यकर्ते तसेच पत्रकार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0